अन्यायग्रस्त दीपाली लोणकर यांच्या उपोषणाला दिली भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी भेट..

0
37


दीपाली लोणकर यांना न्याय देण्याची केली मागणी तीन दिवसांपासून लोणकर यांचे उपोषण चालू..

खोपोली- दत्तात्रय शेडगे

खालापुर तालुक्यातील कोप्राण येथील कंपनीत काम करण्याऱ्या दीपाली लोणकर यांच्याकडे कंपनीचे मॅनेजर संजय खोत यांनी शरीर सुखाची मागणी केली होती त्यास दीपाली यांनी विरोध करीत त्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला याचा राग मनात धरून कंपनी व्यवस्थापनाने दीपाली लोणकर हिला कामावरून काढून टाकले.


अन्याय ग्रस्त दीपाली ला कामावर घेण्यासाठी तिने खालापूर तहसिल समोर गेल्या तीन दिवसापासून उपोषण चालू केले आहे या उपोषणाला भारतीय जनता पार्टीच्या महिला महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी भेट घेऊन दीपाली लोणकर यांना न्याय देण्याची मागणी केली, यावरून दीपाली लोणकर यांना न्याय मिळवून देण्यास प्रशासन सपशेल अपयशी ठरल्याचे दिसून येत आहे.


यावेळी भाजपा उत्तर रायगड कोषाध्यक्ष सनी यादव , उपाध्यक्ष विठ्ठल मोरे , युवा मोर्च्या अध्यक्ष प्रसाद पाटील ,सरचिटणीस शशिकांत मोरेे, महिला अध्यक्षा सुजाता दळवी झ भाजपा खालापूर ,शहराध्यक्ष राकेश गव्हाणकर आदी उपस्थित होते.