मावळ (प्रतिनिधी): तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यासाठी शुक्रवार दि.10 मार्च शुक्रवार रोजी किल्ले मल्हारगड इथून शिवज्योत घेऊन शिलाटणे गावातील शिवभक्त परतीच्या मार्गावर असताना ताथवडे जवळ त्यांच्या वाहनाचा अपघात झाला होता. या अपघातात शिलाटणे गाव आणि मावळ तालुक्यातील इतर काही गावांतील एकूण 33 शिवभक्त जखमी झाले होते.
त्यापैकी एका दहा वर्षीय शिवभक्ताचा आज गुरुवार दि.16 मार्च रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.आर्यन सोमनाथ कोंढभर (वय 10) असे मृत्यू झालेल्या चिमुकल्या शिवभक्ताचे नाव आहे.
हि दुःखद बातमी समोर येताच शिलाटणे गावासह संपूर्ण मावळ तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
सदर अपघातात आर्यन हा गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र आज दुपारच्या सुमारास रावेत येथील ओजस हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. चिमुकल्याची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अपयशी ठरली आणि संपूर्ण मावळ तालुक्यावर शोककळा पसरली.