कार्ला – मावळ प्रतिनिधी
कोरोना संकटकाळात आॕक्सिजन किती महत्त्वाचा आहे हे सर्वांना कळाले असून आॕक्सिजन निर्मितीसाठी वृक्षारोपन करणे काळाची गरज असल्याने ‘चला आॕक्सिजन वाढवूया’ या हेतुने रोटरी क्लब आॕफ तळेगाव एमआयडीसी यांच्या सौजन्याने समाजप्रेमी कै. श्री आप्पासाहेब खांडगे आॕक्सिजन पार्कचे उदघाटन कार्ला येथील श्री एकविरा विद्या मंदिर शाळा व श्रीमती लाजवंती हंसराज गुप्ता ज्युनियर काॕलेज मध्ये नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष व माजी राज्यमंत्री संजय भेगडे,प्रांतपाल रोटरी जिल्हा ३१ चे रोटरी मंजु फडके यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सचिव संतोष खांडगे,जिल्हा उपप्रांतपाल गणेश कुदळे,शालेय समिती अध्यक्ष सोनबा गोपाळे,रोटरी क्लब अध्यक्षा रजनीगंधा खांडगे,सचिव सचिन कोळवणकर,प्राचार्य भगवान शिंदे,पर्यावरण संचालिका ज्योती नवघने,संचालक दामोदर शिंदे,संदिप पानसरे व सर्व रोटरीयण व संस्थेचे मुख्याध्यापक उपस्थीत होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय भेगडे यांनी एकविरा विद्या मंदिर शाळा ही महाराष्ट्र राज्यातील पर्यावरण पूरक शाळा म्हणून नावा रुपाला येईल यात शंका नाही तसेच शाळा सुरु झाल्यावर शाळेसाठी संगणक लॕब उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन देखील दिले.
कोरोना संकटामुळे पर्यावरणाचे निसर्ग संवर्धनाचे महत्त्व पटवून दिले तसेच आॕक्सिजन किती महत्त्वाचा आहे हे आपल्या सर्वांना समजले आहे. हवेतील आॕक्सिजनचे नैसर्गिक प्रमाण कायम ठेवण्यासाठी प्रत्येकाने शक्य ते प्रयत्न केले पाहिजे प्रदूषण मुक्त हवा मिळावा या हेतूने महाराष्ट्रातील श्री एकविरा विद्या मंदिर पहिली शाळा असेल की जेथे आॕक्सिजन पार्क निर्माण करण्यात आले असल्याचे संस्थेचे सचिव संतोष खांडगे यांनी सांगितले.
तसेच जिल्हा प्रांतपाल मंजु फडके यांनी रोटरी क्लब आॕफ तळेगाव एमआयडीसी राबवत असलेल्या उपक्रमाचे कौतुक करुन भविष्यात मावळ तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक शाळांना रोटरी क्लबच्या माध्यमातुन मदत करणार असल्याचे सांगितले या आॕक्सिजन पार्क मध्ये व परिसरात जास्तीतजास्त आॕक्सिजन निर्मिती करणाऱ्या स्नेक प्लान्ट, ऐरिका पाम, क्रोटोन प्लान्ट,रेपिक्स पाम,फाईकस रामतुळस ,क्रूष्ण तुळस, वैजंती तुळस,कोरपड,कापुर,एक्झोरा,ट्रेसनाा ,युग्लिना, वड, पिंपळ,अशा पाचशे ते साडे पाचशे वृक्षांची रोपे या उद्यानात व शाळेच्या परिसरात लावण्यात आली आहेत.तसेच मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपन देखील करण्यात आले.
यावेळी अध्यक्ष संजय भेगडे,संतोष खांडगे,मंजु फडके,गणेश कुदळे रजनीगंधा खांडगे यांनी आपली मनोगते व्यक्त केली,
या पर्यावरण संवर्धन कार्यक्रम यशस्वीतेसाठी शालेय समिती अध्यक्ष सोनबा गोपाळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचार्य भगवान शिंदे,शिक्षक प्रतिनीधी संतोष हुलावळे,पर्यावरण प्रमूख सचिन हुलावळे,बाबाजी हुलावळे,उमेश इंगूळकर,काकासाहेब भोरे,मधुकर गुरव,विकास दगडे,दिलीप पोटे,वरुण दंडेल,प्रविण राऊत,शितल शेटे,अनुराधा हुलावळे,अरुणा बुळे,नाजुका सोनकांबळे,मिरा शेलार,शिल्पा वर्तक,प्रणाली उंबरे यांनी प्रयत्न केले.कार्यक्रमाचे प्रास्तविक रजनीगंधा खांडगे स्वागत भगवान शिंदे,सुत्रसंचालन उमेश इंगूळकर यांनी तर आभार दिलीप पोटे यांनी मानले.