Monday, July 15, 2024
Homeपुणेमावळअफवेमुळे बॅके समोर महीलांची गर्दी , सोशल डीस्टंन्सिग चा उडाला फज्जा.

अफवेमुळे बॅके समोर महीलांची गर्दी , सोशल डीस्टंन्सिग चा उडाला फज्जा.

कार्ला मावळ दी.30 जुन 2020(अष्ट दीशा न्यूज कार्ला प्रतिनिधी- गणेश कुंभार) कार्ला येथे बॅक आॅफ महाराष्ट्र शाखेत जनधन योजनेसाठी दी.30 रोजी महीलांनी मोठी गर्दी केली .जनधनअंतर्गत पुढील तीन महिन्यांसाठी प्रतेक महीन्याला खातेदाराच्या खात्यात पाचशे रुपये जमा होनार या आफवेने कार्ला येथील बॅक ऑफ महाराष्ट्र या शाखेत महीलांनी खाती उघडण्यासाठी गर्दी केली होती.

सकाळ पासून कार्ला, शीळाटने , वेहरगाव, दहीवली व आजुबाजुच्या परिसरातील सुमारे तीनशे ते चारशे महीलांनी महाराष्ट्र बॅक समोर खाते उघडण्यासाठी गर्दी केली होती. सरकारने लाॅक डाउन कायम ठेवून आपली दैनंदिन कामे सरकारी सुचनांचे पालन करून करन्याचे आव्हान केले आहे.परंतु नागरिकांना कोरोना रोगाचा वीसर पडला की काय असेच दिसुन आले.

या वेळी शोशल डीस्टंन्स चा पुर्ण फज्जाच ऊडाल्याचे ही दीसून आले.बॅक महाराष्ट्र शाखा चे आधीकारी साईश पाटील यांच्या ही बाब लक्षात आल्यावर त्यांनी या संदर्भातील आॅनलाईन जी आर बघीतला परंतु असा कुठलाही जी आर शासनाने काढला नसुन तशी नवीन घोषना ही केली नाही असे सांगितले. मागील तीन महीन्यात लाॅक डाउन काळात ज्यांचे जनधन खाते होते त्यांच्या खात्यात पाचशे रुपये जमा झाले आहेत असे शाखा आधीकारी पाटील यांनी सांगितले .तरी नागरीकांनी सुध्दा अफवांवर विश्वास ठेवू नये व एकत्रित येवुन गर्दी करुन कोरोना या रोगाला आमंत्रण देवु नये असे आवाहन अष्ट् दीशा न्यूज च्या वतीने नागरीकांना करन्यात येत आहे .

- Advertisment -

You cannot copy content of this page