Sunday, November 3, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईअबब केवढी ही महागाई,,,एल पी जी गॅसचे दर 1 हजार पार !

अबब केवढी ही महागाई,,,एल पी जी गॅसचे दर 1 हजार पार !

मुंबई : महागाईने कहरच केला आहे . आधीच मेटाकुटीला आलेल्या कोरोना महामारीमुळे नागरिकांना आता आणखी एक झटका दिला आहे . इंधन कंपन्यांनी घरगुती गॅसच्या दरात तब्बल 50 रुपयांनी वाढ केली आहे . त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मात्र चांगलीच कात्री लागणार आहे . तर गृहिणींचे आर्थिक बजेट कोलमडणार असल्याचे चित्र दिसत आहे. 14.2 किलोच्या एलपीजी गॅस सिलेंडर दराने 1 हजार रुपयांचा टप्पा ओलांडला आहे . मुंबईत आता घरगुती वापरासाठीच्या एलपीजी गॅस सिलेंडरसाठी 1052.50 रुपये मोजावे लागणार आहेत.

ऑईल मार्केट कंपन्यांनी आज नवीन गॅस दर जाहीर केले आहेत . त्यानुसार , राजधानी दिल्लीत घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरसाठी 1053 रुपये , कोलकातामध्ये 1069रुपये आणि चेन्नईत 1068.50 रुपये मोजावे लागणार आहेत . मागील एक वर्षात घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात जवळपास 200 रुपयांची वाढ झाली आहे . दिल्लीत एक वर्षापूर्वी 834.50 रुपयांच्या घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरचा दर आज 1053 रुपये झाला आहे . याआधी मे महिन्यात घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात 4 रुपयांची वाढ झाली आहे . महागाईने आधीच सर्वसामान्यांचे बजेट बिघडले असताना त्यात आता एलपीजी गॅस दरवाढीची भर पडली आहे.

- Advertisment -

You cannot copy content of this page