Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडअब की बार ४०० पार - अब की बार फिर मोदी सरकार-...

अब की बार ४०० पार – अब की बार फिर मोदी सरकार- गोवा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा एल्गार !

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) होणाऱ्या २०२४ च्या लोकसभेच्या निवडणुक पूर्व तयारीसाठी कार्यकर्त्यांना तयारीला लागा , हा देशाचे पंतप्रधान मान. नरेंद्रजी मोदी साहेबांचा संदेश घेवून गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची नुकतीच कर्जत तालुक्यातील शेळके मंगल कार्यालयाच्या सभागृहात भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता महासंमेलनात उपस्थिती होती . हा महामेळावा नसून भाजपाचां पदाधिकारी व कार्यकर्त्यांना उभारी येवून , येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत सर्वांनी कामाला लागा व ” अब की बार ४०० पार – अब की बार फिर मोदी सरकार ” हि घोषणा देत पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान म्हणून मोदीजी झाले पाहिजेत , असा एल्गार त्यांनी करून कार्यकर्त्यांना जोषपूर्ण वातावरण केले.
भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय नेतृत्वाने घेतलेल्या निर्णया नुसार केंद्रीय नेते आणि विविध राज्यातील बीजेपी चे मुख्यमंत्री लोकसभेचा क्लस्टर प्रवास करणार आहेत. मावळ, रायगड, आणि सिंधुदुर्ग या तीन लोकसभा मतदार संघात गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा प्रवास होणार आहे. त्याची सुरुवात आज कर्जत येथून मंगळवार दि. २७ फेब्रुवारी २०२४ रोजी करण्यात आली . यावेळी शेळके मंगल सभागृह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी खचाखच भरला होता.

या सभेस मार्गदर्शन करताना गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी धार्मिक क्षेत्रातील महाराष्ट्रातील अनेक वाऱ्यांची महंती सांगितली . देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी केलेले कार्य त्यांनी सांगून मावळ लोकसभा मतदार संघात भाजपाचे खूप चांगले काम असून याची प्रशंसा त्यांनी केली . मोदींजींचे हे कार्य तुम्ही ग्रामीण भागापर्यंत प्रत्येक घटकापर्यंत नेवून पुन्हा एकदा पक्षाला उभारी देवून भाजपाला यश संपादन करा व पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी झाले पाहिजे , मावळ मतदार संघ भाजपासाठी मागणी करणार असून वरिष्ठ पातळीवरून ज्या कुणाला हा मतदार संघ मिळेल व जो उमेदवार असेल त्याचे सर्व काम करून निवडून आणतील असा विश्वास त्यांनी याप्रसंगी व्यक्त केला.
यावेळी माजी आमदार सुरेशभाऊ लाड यांनी या निवडणुकीत मावळ मतदार संघ नक्कीच चमत्कार घडवेल , असे मत व्यक्त केले.
याप्रसंगी अनेक मान्यवरांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले .
यावेळी या मतदार संघातील सर्व ६ विधानसभा मतदारसंघा च्या निवडणूक व्यवस्थापन समित्या , लोकसभा कोअर कमिटी , विधानसभा कोअर कमिटी यांची आढावा बैठक शेळके मंगल कार्यालय या ठिकाणी सकाळी ९ – ३० ते १० – ३० या दरम्यान झाली त्या नंतर कार्यकर्ता संमेलन झाले.
या संमेलनास लोकसभेतील चारही आमदार प्रशांत ठाकूर , आ.महेश बालदि , आ. अश्विनी जगताप , आ.उमा खापरे , तसेच माजी मंत्री बाळासाहेब भेगडे, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील , क्लस्टर प्रमुख बाळासाहेब पाटील , माजी खासदार अमर साबळे , प्रदेश उपाध्यक्ष अतूल काळसेकर , जिल्हा अध्यक्ष शरद बुट्टे पाटील – पुणे , शंकर जगताप – पिंपरी चिंचवड , अविनाश कोळी जिल्हाध्यक्ष उत्तर रायगड , यांसह सहाही विधानसभेचे सर्व पदाधिकारी , शक्ति केंद्र प्रमुख , बूथ अध्यक्ष , उपस्थित होते . तर कर्जत खालापूर मतदार संघाचे माजी आमदार सुरेशभाऊ लाड , जिल्हा सरचिटणीस दिपक बेहरे , चिटणीस रमेश मुंडे , प्रदेश उपाध्यक्ष सुनील गोगटे , विधानसभा अध्यक्ष किरण ठाकरे , कर्जत तालुका अध्यक्ष राजेश भगत , सर्व नगरसेवक , ग्रामपंचायत सरपंच , सदस्य , महिला आघाडी पदाधिकारी हे देखील उपस्थित होते.
- Advertisment -

You cannot copy content of this page