Sunday, June 23, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडअमृताजण ब्रिज वरून 150 फूट कार दरीत कोसळून अडकले कुटूंब बोरघाट पोलिसांमुळे...

अमृताजण ब्रिज वरून 150 फूट कार दरीत कोसळून अडकले कुटूंब बोरघाट पोलिसांमुळे वाचले..

काळ आला होता पण वेळ आली नव्हती.अमृताजण ब्रिज वरून 150 फूट कार दरीत कोसळून अडकले कुटूंब बोरघाट पोलिसांमुळे वाचले प्राण बोरघाट पोलिसांची दमदार कामगिरी…

खोपोली( दत्तात्रय शेडगे)मुबंई पुणे एक्सप्रेसवेवरून जुन्या अमृताजण ब्रिज वरून आज दुपारी एक कार दरीत कोसळून भीषण अपघात झाला काळ आला होता पण वेळी आली नव्हती या म्हणीप्रमाणे ही कार मुबंई पुणे एक्सप्रेस वेवरील जुन्या अमृताजण ब्रिज वरून दत्तवाडी येथील दरीत सुमारे 150 फूट कोसळली असून त्या गाडीत चालक ,पत्नी आणि दोन लहान मुले अडकली होती.

या घटनेची माहिती अफकोन कंपनीतील कामगारांनी बोरघाट पोलिसांनी दिल्यानंतर बोरघाट पोलिसांनी तात्काळ याची दखल घेत शोधमोहीम चालू केली त्या गाडीचा फोटो क्लीअर दिसत नसल्यामुळे कार शोधण्यात अडथळा येत होता नंतर गाडीच्या लाईट टॉवरच्या दिशेने शोध घेतला असता गाडी बॅटरीहिल च्या जवळ दत्तवाडी येथील दरीत कोसळल्याची निदर्शनास आले.

बोरघाट पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल होत गाडीत अडकेले मंगल रणविजयसिंग चौहान हे गंभीर जखमी झाले होते त्यांना तात्काळ एमजीएम येथील रुग्णालयात हलविण्यात आले तर त्याची पत्नी व दोन लहान मुले सुखरूप बाहेर काढली काळ आला होता मात्र वेळ आली नव्हती या म्हणी प्रमाणे आज बोरघाट पोलिसांनी कार मध्ये अडकेल्या चव्हाण कुटूंबाचे जीव वाचवून दमदार कामगिरी केल्याने सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहेत.

- Advertisment -

You cannot copy content of this page