अमोल आण्णा ओंबळे यांच्या वाढदिवसानिमित्त भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट व सुन्नी मुस्लिम जमात ट्रस्टला प्रत्येकी 11000 चा धनादेश…

0
246

लोणावळा दि.7: तरुण मराठा मंडळ(ट्रस्ट) अध्यक्ष अमोल आण्णा ओंबळे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या हस्ते श्री भैरवनाथ देवस्थान विश्वस्त (गावठाण) आणि काशम शा दर्गा यांस प्रत्येकी 11000 रुपयांचा धनादेश देण्यात आला.

यावेळी विश्वस्त गणपत हारपुडे,भगवान पांगारे,संजय तिकोने,गोपाळ हारपुडे व समस्त ग्रामस्थ यांनी हा धनादेश स्वीकारला.


यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचिव निखिल कवीश्वर, लोणावळा शहर काँग्रेस अध्यक्ष प्रमोद गायकवाड, माजी नगरसेवक नासीर शेख, सुन्नी मुस्लिम जमातचे ट्रस्टी अब्बास खान, माजी ट्रस्टी जाबीर शेख, युवक नेते फिरोज बागवान, सलमान खान, सनी हेलंडे,इरफान शेख, सूर्यकांत औरंगे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.