अर्चना ट्रस्टच्या वतीने विधवा व निराधार कुटूंबाना रेशनकीटचे वाटप..

0
59

खोपोली- दत्तात्रय शेडगे

पनवेल तालुक्यातील आपटा व कर्नाळा विभागातील 9 आदिवासी वाड्यातील 90 विधवा व निराधार कुटूंबाना जीवनाश्यक वस्तूसह रेशन किट चे वाटप करण्यात आले, हा कार्यक्रम काल सारसई ( आपटा) येथे पार पडला.


देशांवर कोरोना व्हायरसचे मोठे संकट आले असून देशात लॉक डाऊन जाहीर असल्याने यात गोर गरीब जनतेचे अतोनात हाल झाले आहेत ,ह्या सामाजिक बांधिलकीतुन अर्चना ट्रस्ट मुंबई यांच्या वतीने काल आपटा सारसई विभागातील 90 विधवा महिलना व निराधार कुटूंबाना एक महिना पुरेल एवढ्या रेशन किट चे वाटप करणयात आले हा कार्यक्रम सामाजिक कार्यकर्ते रत्नाकर घरत यांच्या नेतृत्वाखालीपार पडला.


यावेळी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर घरत, सामाजिक कार्यकर्ते रत्नाकर घरत, शिवसेना सारसई शाखाप्रमुख लक्ष्मण बावदाणे, राईस पिटु, संतोष ठाकूर, रसाळ सर, संदीप टेंबे, कृष्णा वाघे राम वाघे, बाबू ढेबे बुधाजी डोरे, संतोष शिंगाडे आदी उपस्थित होते.