![]()
if(isset($image4)); {?>
![]()
} ?>
if(!empty($image5)); {?>
![]()
} ?>
मावळ (प्रतिनिधी): मावळ तालुक्यातील विकासकामांसाठीची माहिती देण्यासाठी आमदार सुनील शेळके यांची पत्रकार परिषद संपन्न झाली. अर्थसंकल्पीय अधिवेशनात तालुक्यातील विकासकामांसाठी 341.35 कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून यामध्ये रस्त्यांची कामे आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या इमारतीसाठी निधीचा समावेश असल्याची माहिती आमदार सुनील शेळके यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जिल्हा नियोजन समितीने मंजूर केलेल्या विकासकामांना महाविकास आघाडी सरकारनेही स्थगिती दिली होती. यामुळे आमदार शेळके यांनी हिवाळी अधिवेशनात याबाबत आक्रमक भूमिका घेत सरकारला धारेवर धरले. तसेच या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीलाच आमदार शेळके यांनी विकासकामांच्या निधीबाबत सरकारचे कान टोचले. दरम्यान, या अर्थसंकल्पात मावळसाठी किमान 400 कोटी रुपये आणण्याच्या पाठपुराव्याला यश आले.
तालुक्यातील खडकाळे, कऱ्हे, काले कॉलनी, परंदवडी, बेबडहोळ,पिंपळखुटे – शिवणे या रस्त्यांच्या कामांचा समावेश हायब्रीड कम्युनिटी या शीर्षकाखाली करण्यात आला आहे. एकूण 32,600 किमीचे रस्ते 10 कोटी रुपये प्रति किमी दराने बांधण्यात येणार असून, त्यासाठी 326 कोटी रुपये खर्च येणार आहे.
दरम्यान, पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या स्काय वॉक प्रकल्प, कुंडमळा पूल, कोथुर्णे पूल,वराळे-नानोली पूल, क्रीडा संकुलासाठीही निधीची आवश्यकता होती. मात्र, या कामांसाठी या सरकारने कोणत्याही प्रकारचा निधी दिला नसल्याची खंत आमदार शेळके यांनी व्यक्त केली.
सुनील शेळके म्हणाले, महाविकास आघाडी सरकारने मावळसाठी एक हजार कोटींहून अधिक निधी दिला होता. आघाडी सरकारच्या अर्थसंकल्पात मावळ तालुक्यासाठी सुमारे 350 कोटी रुपयांच्या विकासकामांना मंजुरी देण्यात आली आहे.
त्यानुसार बेबडहोळ ते पिंपळखुटे आणि माळवंडी ढोरे ते थुगाव ( चार कोटी रुपये),कान्हे फाटा येथील बंद नाले आणि काँक्रिटीकरण (एक कोटी रुपये), तर रस्ते सुधारण्यासाठी (दिड कोटी रुपये),ग्राम सडक योजनेतून लोहरवस्ती रस्त्यासाठी (1.39 कोटी रुपये),सुदुंबरे ते ठाकरवाडी रोडसाठी (83.25 लाख रुपये),खांडशी रोडसाठी (2.98 कोटी रुपये),व राज्य उत्पादन शुल्क इमारतीसाठी – 3.47 कोटी रुपये अशी नियोजित कामे संभव्यात होणार आहेत.