Saturday, February 24, 2024
Homeक्राईमअल्पवयीन मुलीला फूस लावून अतिप्रसंग करणाऱ्या नराधमास लोणावळा शहर पोलिसांकडून अटक…

अल्पवयीन मुलीला फूस लावून अतिप्रसंग करणाऱ्या नराधमास लोणावळा शहर पोलिसांकडून अटक…

लोणावळा (प्रतिनिधी): अल्पवयीन मुलीला फुस लावत तीच्यावर अतिप्रसंग करणाऱ्या नराधमाला लोणावळा शहर पोलिसांनी अटक केली आहे. आज शुक्रवार दि.5 रोजी सकाळी 10:00 वाजण्याच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडला. याप्रकरणी पिडीत मुलीच्या आईने पोलिसांत फिर्याद दिली आहे.
दीपक संजय सोनवणे (वय 28, रा. तुंगार्ली, लोणावळा) असे त्या व्यक्तीचे नाव आहे. त्याच्यावर लोणावळा शहर पोलीस ठाण्यात भादंवी कलम 376, बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 कलम 4,8,12 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वलवण भागात राहणाऱ्या एका बारा वर्षीय अल्पवयीन मुलीला तीच्या आजीच्या दुकानावर सोडतो असे सांगत त्याने तीला बारा बंगला लोणावळा येथील पडीक असलेले रेल्वे कॉर्टर मध्ये नेऊन तीच्यावर अतिप्रसंग केला असल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे. याप्रकरणी लोणावळा शहर पोलीस निरीक्षक सिताराम डुबल यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश बावकर या घटनेचा पुढील तपास करत आहेत.
- Advertisment -

You cannot copy content of this page