Sunday, September 24, 2023
Homeक्राईमअल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवणाऱ्यास लोणावळा शहर पोलिसांनी...

अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवणाऱ्यास लोणावळा शहर पोलिसांनी ठोकल्या बेडया..

लोणावळा दि.26: अल्पवयीन मुलीला लग्नाचे अमिष दाखवत तिच्याशी वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवणाऱ्या आरोपी उदय दिपक म्हात्रे ( वय 23, रा. ठोंबरेवाडी, लोणावळा, मूळ राहणार वळके, ता. मुरुड, जिल्हा रायगड ) यास लोणावळा शहर पोलिसांनी अटक केली आहे.त्यासंदर्भात लोणावळा शहर पोलीस स्टेशनला पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादी वरून आरोपी उदय म्हात्रे याच्या विरोधात भा.द.वी. कलम 376 ( 2 )( n ) बालकांचे लैंगिक अपराधा पासून संरक्षण अधिनियम 2021 कलम 4,8,12 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


दाखल झालेल्या फिर्यादे नुसार आरोपी म्हात्रे याने सध्या लोणावळ्यात राहणाऱ्या ( मुळच्या उत्तर प्रदेश ) येथील एका अल्पवयीन मुलीला ती अल्पवयीन असल्याचे माहित असून देखील तिच्याशी ओळख निर्माण करून तिला लग्नाचे अमिष दाखवत वेळोवेळी तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले त्यामुळे ती गरोदर राहीली घरच्यांच्या लक्षात येताच त्यांनी लोणावळा शहर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली सदर फिर्यादी वरून गुन्हा दाखल करून आरोपी उदय म्हात्रे यास अटक करण्यात आली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास लोणावळा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक प्रदीप चौधरी हे करत आहेत.

- Advertisment -