Wednesday, May 29, 2024
Homeपुणेलोणावळाअश्लील डान्स करत असताना हॉटेल विस्प्रिंग वूडवर IPS कार्तिक यांची कारवाई 53...

अश्लील डान्स करत असताना हॉटेल विस्प्रिंग वूडवर IPS कार्तिक यांची कारवाई 53 जणांना घेतले ताब्यात…

लोणावळा (प्रतिनिधी): उप विभागीय सहायक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांची धमाकेदार कारवाई, लोणावळ्यातील हॉटेल विस्प्रिंग वुड यावर बुधवार दि.1 रोजी रात्री 11:40 च्या सुमारास कारवाई करत अश्लील चाळे करणाऱ्या 53 जणांना ताब्यात घेतले.
लोणावळा उपविभागीय सहायक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांना स्वतः गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, काही इसम व महिला असे अश्लील गाण्यावर अश्लील नृत्य करुन साऊंड सिस्टीम मोठया आवाजात वाजवून विवस्त्र चाळे करुन गाण्याच्या तालावर नाचत आहेत अशी माहिती मिळाल्याने लोणावळा विभागाचे सहायक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी स्वतः पथकासह व लोणावळा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सिताराम डुबल व पोलीस स्टाफ असे समांतर लोणावळा विस्प्रिंग वुड हॉटेल मध्ये अचानक छापा टाकला असता सदर ठिकाणी एकुण 44 पुरुष व 9 महिला असे विस्प्रिंग वुड हॉटेलच्या प्रांगणात अश्लील गाण्यावर अश्लील नृत्य करुन विवस्त्र चाळे करुन नियम व तरतुदीचे उल्लघंन करीत असताना मिळून आले आहेत.
सदर इसमांना व महिलांना ताब्यात घेवून साऊंड सिस्टीम पंचासमक्ष जप्त करण्यात आले आहे.याबाबत पोलीस कॉन्स्टेबल संदिप अजिनाथ बोराडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लोणावळा शहर पोलीस ठाणे गु.र.नं. 294,34 महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 33 (एन) 131 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदरची कारवाई लोणावळा विभागीय सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शन व सूचनेनुसार उपविभागीय कार्यालय स्टाफ व लोणावळा शहर पोलीस स्टेशन स्टाफ यांनी केली आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page