Monday, July 22, 2024
Homeमहाराष्ट्ररायगड" अष्टपैलू नेतृत्व सुनील गोगटे " यांचा अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात संपन्न..

” अष्टपैलू नेतृत्व सुनील गोगटे ” यांचा अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात संपन्न..

विधानसभा निवडणुकीत स्वतंत्र उभे राहिल्यास भाजपाचा ” घोडा ” नक्कीच उडणार – गणेश तात्या भेगडे..

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) सन २०१४ साली निवडणुकीत जशी परिस्थिती निर्माण झाली तशीच २०२४ साली झाल्यास सर्व पक्ष स्वतंत्र उभे राहिल्यास या निवडणुकीत या मतदार संघात भाजप उमेदवाराचा ” घोडा ” उडून नक्कीच विजयी आपला असेल , असे येथील वातावरण असल्याचे मत , भारतीय जनता पक्षाचे किसान मोर्चा प्रदेश अध्यक्ष गणेश तात्या भेगडे यांनी कर्जत रॉयल गार्डन सभागृहात किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष सुनील गोगटे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या अभिष्टचिंतन सोहळ्यात व्यक्त केले.
यावेळी व्यासपीठावर किसान मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष गणेश तात्या भेगडे , भाजप रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी , माजी आमदार सुरेशभाऊ लाड , जिल्हा उपाध्यक्ष वसंतराव भोईर , जिल्हा चिटणीस रमेश मुंडे , किसान मोर्चा सरचिटणीस मनोज कासवा , विधानसभा निवडणूक प्रमुख किरण ठाकरे , माजी तालुका अध्यक्ष मंगेश म्हसकर , किसान मोर्चा रायगड जिल्हाध्यक्ष अतुल दादा बडगुजर , सरचिटणीस जनार्दन म्हसकर , मा. नगराध्यक्ष राजेश दादा लाड , नरेश मसणे, तालुका सरचिटणीस वसंत महाडिक , कर्जत शहर अध्यक्ष विजय जिनगरे , सरचिटणीस सूर्यकांत गुप्ता , खोपोली शहर अध्यक्ष रमेश रेटरेकर , विस्तारक हेमंत नान्दे , सूर्यकांत देशमुख , किसान मोर्चा तालुका अध्यक्ष शिरीष कदम , मा. नगरसेवक बळवंत घुमरे , मिनेश मसने , सोशल मीडिया कोकण प्रमुख गायत्री परांजपे , महिला मोर्चा उपाध्यक्ष बिनीता घुमरे , तालुका सरचिटणीस राधा बहुतुले , तालुका उपाध्यक्ष प्रीति तिवारी, खोपोली महिला अध्यक्ष अत्रे ताई , दर्शना बोराडे , कल्पनाताई दास्ताने , प्रमोद पाटील, मारुती जगताप , स्नेहा गोगटे , सर्वेश गोगटे , रामदास घरत , शिवसेनेच्या मा. पंचायत समिती सदस्या सौ. मीना ताई थोरवे , सौ. मनिषा भासे , गणेश गवई त्याचप्रमाणे अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना गणेश तात्या भेगडे पुढे म्हणाले की , प्रत्येक वाढदिवसाला ” सिंहावलोकन ” करणे गरजेचे आहे . चुकीची सुधारणा करून भविष्यात योग्य नियोजन करण्याचा दिवस , अष्टपैलू नेतृत्व असलेले सुनील गोगटे यांच्या अफाट कार्यामुळेच रायगडात मोठ्या नेत्यांनी शिफारस केल्याने त्यांची प्रदेश उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले . ” ग्राम परिक्रमा यात्रेच्या ” माध्यमातून शेतकरी बांधवांच्या गावात जाऊन समस्या जाणून घेतल्या , ५ हजार गावांत जाऊन भेटी देवून संवाद साधला , राज्यात चांगले काम सुनील गोगटे यांच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यात झाले असल्याचे गौवोद्गार त्यांनी काढले . पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नंतर ३ वेळा पंतप्रधान होण्याचा मान मोदीजी यांना मिळाला , यावर त्यांनी प्रकाश टाकला . गेली १० वर्षांत मोदीजींनी शेतकरी बांधवांसाठी खूप योजना दिल्या , मात्र त्यांचे सरकार शेतकरी विरोधात आहे , अशी अफवा पसरवली , ४०० पार केल्यावर घटना बदलतील म्हणून संविधान बचाव हा देखील खोटा प्रचार केला , मोदी यांनी सूर्य – चंद्र जोपर्यंत आहे , तोपर्यंत आरक्षण बंद होणार नाही , अशी ग्वाही दिली होती , जे गरजवंत आहेत त्या मराठा समाजाला आरक्षण भेटलेच पाहिजे , असे ठणकावून सांगत , मात्र शरद पवार हे मुख्यमंत्री असताना आरक्षण देण्यात आले नाही , म्हणून आपल्या समाजाने आपले हित शत्रू कोण आहेत हे ओळखले पाहिजे , फडणवीस सरकार पाडायचं आणि पवारांचं निवडून द्यायचं अशी सुपारी जरांगे पाटील यांनी घेतली आहे , असा आरोप देखील त्यांनी केला , वारकरी हे शेतकरीच आहेत , शिंदे फडणवीस सरकारने त्यांच्या समस्या सोडविल्या आहेत , ७० वर्षे काँग्रेस च्या सरकारने किती शेतकऱ्यांचे भले केले ? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला.
ज्यांच्या नशिबात आहे , त्याला ते मिळेलच , मा. आमदार सुरेश भाऊ लाड आपल्यात आहेत हे आपले सुदैव आहे , २०१४ साली आलेली परिस्थिती आल्यास आपल्याला देखील उमेदवारीची संधी मिळून आपला घोडा देखील नक्कीच उडेल , अशी ग्वाही देवून अष्टपैलू नेतृत्व सुनील गोगटे यांना शुभेच्छा व्यक्त केल्या.

माजी आमदार सुरेश भाऊ लाड यांनी सुनील गोगटे हे ” अजातशत्रू ” असा त्यांचा स्वभाव असून शेतकऱ्यांसाठी दरवर्षी खास उपक्रम राबवितात , खतांचे वाटप हे शेतकरी उन्नतीसाठी महान कार्य असल्याचे सांगितले . जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी सुनील गोगटे यांचे कोकणात कार्य मोठ्या प्रमाणात आहे , शासकिय योजना शेतकरी बांधवांना मिळण्यास ते नेहमी अग्रेसर असतात . शेडुंग टोल नाका टोल माफी हि सुनील गोगटे यांचीच किमया , त्यांचेच श्रेय आहे , असे गौरोद्गार त्यांनी काढले .
मोदी सरकारच्या विरोधात विरोधकांनी प्रचार केला मात्र तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यावर १२ वा हप्ता शेतकरी बांधवांना मिळावा म्हणून पहिली सही केली , यावर प्रकाश टाकला . तर यावेळी रमेश मुंडे यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून सुनील गोगटे यांचे कार्य भाजपासाठी खूप महत्त्वाचे असल्याचे सांगितले , वसंत शेठ भोईर यांनी त्यांचे राजकीय भविष्य उज्वल होवो , अशा शुभेच्छा व्यक्त केल्या.

किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष सुनील गोगटे यांनी येथील पोषक वातावरण असल्याने येथील उमेदवारी भाजपालाच देण्यात यावी , अशी मागणी त्यांनी केली , व आलेल्या सर्व शेतकरी बांधव , मान्यवर , महिला आघाडी , पदाधिकारी , कार्यकर्ते यांचे आभार व्यक्त करत ५५० शेतकऱ्यांना खतांचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
- Advertisment -

You cannot copy content of this page