Sunday, December 22, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडअष्टविनायक क्षेत्र महड येथे भक्तांच्या दर्शनासाठी कडक नियमावली..

अष्टविनायक क्षेत्र महड येथे भक्तांच्या दर्शनासाठी कडक नियमावली..

शासनाने दिलेल्या नियमाचे पालन करीत भक्तांना दिले जाते दर्शन…

प्रतिनिधी-दत्तात्रय शेडगे.

अष्टविनायक गणपती पैकी महड गावातील एक गणपती क्षेत्र म्हणजे श्री वरदविनायक गणपती मंदिर. या मंदिरात दैनंदिन असंख्य भाविक दर्शनासाठी येत श्री वरदविनायक गणपती बाप्पाचे दर्शन घेत असतात. परंतु कोरोना लॉकडाऊनच्या काळात काही महिने मंदीर देवस्थान बंद ठेवल्याने गणेश भक्त नाराज झाल्याचे पाहायला मिळाले.

परंतु कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव कमी झाल्याने शासनाने दिलेल्या नियमाचे पालन करीत भक्तांसाठी मंदीराची दारे खुले करण्यात आली होती. मात्र आता कोरोनाने पुन्हा शिरकाव केल्याने शासनाच्या वतीने कडक नियम लावण्यात आले असता महड मंदिरातही भक्तांना नियम लावत दर्शन देण्यात येत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यासाठी मंदिर व्यवस्थापनाकडून वेगळे पथक निर्माण करीत भक्तांना सुचना देण्यात येत आहेत.


मात्र आता पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने शासनाने नवीन नियमावली काढत दर्शनासाठी कडक नियम लावल्याने अष्टविनायक क्षेत्र महड मंदिराचे या नियमाचे पालन करित भक्तांना दर्शन देण्यात येत आहे. त्या अनुषंगाने मंदिर व्यवस्थापन कमिटी चोख बंदोबस्त करीत आहेत. त्यामुळे याठिकाणी दर्शनाला येताना भाविक भक्तांनी नियम पालन करा असे आवाहन मंदिर व्यवस्थापन कमिटीने केले आहे, जर कोणत्या भक्तांनी नियमाचे पालन केले नाहीतर दर्शन मिळणार नाही असे सांगण्यात येत आहे.

- Advertisment -

You cannot copy content of this page