अष्ट दिशा बातमीचा इफेक्ट भांगरवाडी येथील ड्रेनेज लाईन दुरुस्तीच्या कामाला सुरुवात…

0
319

(अष्ट दिशा च्या बातमीचा इफेक्ट)
लोणावळा दि.3 : लोणावळा नगरपरिषदेकडून मागील एक ते दिड महिन्यापूर्वी भांगरवाडी भागातील आश्रय हार्डवेअर ते सहारा बिल्डिंग हा रस्ता पाईप लाईनच्या कामासाठी खोदण्यात आला होता काम पूर्ण झाल्यानंतर रस्त्यावरील खड्डाही जे सी बी च्या सहाय्याने बुजविण्यात आला.

परंतु खड्डा बुजवत असताना मंगरीश सोसायटी समोरील ड्रेनेज लाईन तुटली आणि सर्व ड्रेनेजचा मैला रस्त्यावर वाहत असल्याने येथील रहिवाशी व नागरिकांना गेली महिनाभर नाहक त्रास सहन करावा लागत असल्याची बातमी अष्ट दिशाने प्रसिद्ध केली होती.

त्याची दखल घेत भांगरवाडी येथील कार्यशील नगरसेवक देविदास कडू यांच्या प्रयत्नातून लोणावळा नगरपरिषदेने आज ड्रेनेज लाईनच्या कामाला सुरुवात केली आहे. आज महिन्यानंतर मंगरीश सोसायटीतील रहिवाश्यांना समाधानाचा श्वास घ्यायला मिळणार असल्याने येथील नागरिकांकडून नगरसेवक देविदास कडू व नगरपरिषदे चे आभार मानण्यात येत आहे.