Sunday, July 14, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडअसंघटित कामगार काँग्रेस पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन...

असंघटित कामगार काँग्रेस पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन…

पिंपरी चिंचवड दि.30 : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या असंघटित कामगार काँग्रेस पुण्यतिथी निमित्त पिंपरी-चिंचवड शहर तर्फे पिंपरी येथील संपर्क कार्यालय मध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.पुण्यतिथीनिमित्त सुंदर कांबळे ( शहराध्यक्ष असंघटित कामगार काँग्रेस पिंपरी-चिंचवड) यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून 2 मिनिट स्तब्ध उभे राहून त्यांना अभिवादन करण्यात आले.

तसेच दिल्ली च्या सीमेवर गेले 60 दिवस केंद्र सरकारचे काळे कायदे रद्द करण्यासाठी शेतकऱ्यांचे आंदोलन चालू आहे या आंदोलनामध्ये 177 शेतकरी मृत्युमुखी पडले त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. व केंद्रशासनाच्या इंधन दरवाढीचा निषेध करण्यात आला यावेळी सौ. शितलताई कोतवाल समन्वयक महाराष्ट्र प्रदेश घरेलू महिला कामगार काँग्रेस, मोहन उनवणे ( जिल्हा समन्वयक सोशल मीडिया विभाग ), अझरुद्दीन पुणेकर ( जिल्हा समन्वयक हातगाडी टपरी पथरी विभाग), लहू उकरंडे (पिंपरी-चिंचवड शहर उपाध्यक्ष), सौरभ खरात (मोशी विधानसभा अध्यक्ष)आणि सर्व पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.

- Advertisment -

You cannot copy content of this page