Sunday, September 24, 2023
Homeपुणेपिंपरी चिंचवडअसंघटित कामगार काँग्रेस शहरच्यावतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त लहान मुलांना खाऊ वाटप.....

असंघटित कामगार काँग्रेस शहरच्यावतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त लहान मुलांना खाऊ वाटप…..

पिंपरी चिंचवड दि.26: असंघटित कामगार काँग्रेस पिंपरी चिंचवड शहर तर्फे आज संपर्क कार्यालय पिंपरी येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी अशोक मोरे (मा. पर्यावरण विभाग प्रदेशाध्यक्ष,) सुंदर कांबळे (शहराध्यक्ष असंघटित कामगार काँग्रेस पिंपरी चिंचवड शहर), संदेश नवले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तसेच महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहारअर्पण करण्यात आला.

याचप्रमाणे प्रभाग क्रमांक 19 पत्रा शेड लिंक रोड येथे सुंदर कांबळे ( शहराध्यक्ष असंघटित कामगार काँग्रेस पिंपरी चिंचवड शहर) यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी लहान मुलांना खाऊ वाटप करून प्रभाग क्रमांक 30 दापोडी येथे देखील ध्वजारोहणाचा कार्यक्रम शितलताई कोतवाल (समन्वयक महाराष्ट्र प्रदेश घरेलू महिला कामगार काँग्रेस ) यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी अझरुद्दीन पुणेकर (समन्वयक पगारी टपरी विभाग), मोहन सोनवणे (सोशल मीडिया ),मालन ताई गायकवाड (उपाध्यक्ष घरेलू महिला कामगार कॉंग्रेस पिंपरी चिंचवड शहर), वंदना आराख (सचिव घरेलू महिला कामगार पिंपरी चिंचवड), नसीमा मोमीन( पिंपरी विधानसभा अध्यक्ष), शशिकला ताई पोटफोडे( वाॅर्ड.अध्यक्ष दापोडी), नीलम ताई गवळी (वाॅर्ड परीक्षक आनंद नगर), परवीन शेख( मिलिंद नगर)इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

- Advertisment -