Sunday, June 23, 2024
Homeपुणेलोणावळाअहमदनगर येथून अल्पवयीन मुलीला पळवून अत्याचार करणाऱ्या नराधमाला लोणावळ्यातून अटक….

अहमदनगर येथून अल्पवयीन मुलीला पळवून अत्याचार करणाऱ्या नराधमाला लोणावळ्यातून अटक….

लोणावळा (प्रतिनिधी): अहमदनगर राहुरी तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन अत्याचार करणाऱ्या नराधमाला तोफखान पोलिसांनी लोणावळा येथून अटक केली.
याप्रकरणी विश्वनाथ चिमाजी गडदे ( वय 32, रा. गडदे आखाडा, राहुरी ) असे या आरोपीचे नाव असून. यास तोफखान पोलिसांनी माग काढून लोणावळा येथून अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार अदिवासी समाजातील मुलींसाठीच्या शासकीय वसतिगृहात राहत असलेल्या एका अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वसतिगृहात राहणारी राहुरी तालुक्यातील अल्पवयीन मुलगी दिनांक 2 फेब्रुवारीपासून बेपत्ता होती. याप्रकरणी तोफखान पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल आणि गुन्हा दाखल झाला होता.
पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक जे. सी. मुजावर हे या गुन्ह्याचा तपास करत आहेत. त्यांच्यासह अंमलदार प्रदीप बडे यांनी पीडित मुलीला पळवून नेणाऱ्या आरोपी तरुणाचे लोकेशन काढून त्याला लोणावळा येथून ताब्यात घेतले. त्यानंतर पीडित मुलीच्या जबाबावरून त्याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

.

- Advertisment -

You cannot copy content of this page