Monday, July 15, 2024
Homeपुणेतळेगावआंबीतील पिराचा डोंगर येथून बिबट्याने व्यक्तीस पळवले ही अफ़वा, शोध यंत्रनांची माहिती…

आंबीतील पिराचा डोंगर येथून बिबट्याने व्यक्तीस पळवले ही अफ़वा, शोध यंत्रनांची माहिती…

मावळ (प्रतिनिधी): तालुक्यातील आंबी येथे पिराच्या डोंगरावर फिरायला गेलेला एक व्यक्ती बेपत्ता झाला.ही घटना रविवारी (दि. 10) रोजी सायंकाळी उघडकीस आली.
मिळालेल्या माहितीनुसार, तळेगाव एमआयडीसी परिसरातील आंबी गावाजवळ मंगरूळ डोंगर (पिराचा डोंगर) आहे. त्या डोंगरावर रविवारी दोन मित्र फिरण्यासाठी गेले होते.
त्यातील एकजण बेपत्ता झाला. त्यानंतर त्यास बिबट्याने पळवले असल्याची शंका व्यक्त केली जात असताना वन्यजीव रक्षक मावळ संस्था,वन विभाग पथक व MIDC पोलीस यांनी सदर व्यक्तीचा शोध घेण्यास सुरुवात केली मात्र बिबट्याने एका व्यक्तीस उचलून नेले हे सत्य नसून दारुड्यांनी पसरविलेली अफवा असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
- Advertisment -

You cannot copy content of this page