Thursday, October 31, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडआगामी निवडणूका शिवसेना स्वबळावर लढणार-आमदार महेंद्र थोरवे यांचे शिवसैनिकाना तयारीला लागण्याचे...

आगामी निवडणूका शिवसेना स्वबळावर लढणार-आमदार महेंद्र थोरवे यांचे शिवसैनिकाना तयारीला लागण्याचे आवाहन…

प्रतिनिधी (दत्तात्रय शेडगे)
खालापूर येत्या काही महिन्यावर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूका येऊन ठेपल्याने सर्व राजकीय पक्षाची मोर्चे बांधणीला सुरुवात केली असताना याच अनुषंगाने शिवसेना पक्षाने आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वाखाली तांबाटी येथे 1 अॉक्टोबर रोजी सर्वसाधारण बैठक पार पडली. यावेळी नोकर भरती हा शिवसेनेचा आत्मा आहे.

आणि हा मुद्दा निवडणूकीच्या आधी हाती घेतल्यास शिवसेनेला अधिक बळ मिळेल याच अनुषंगाने स्थानिक भरतीच्या मुद्द्याला अधिक महत्व देत तालुक्यातील अनेक कारखान्यात नोकर भरतीमध्ये काहींना हाताशी धरून स्थानिकांना डावलले जात असल्याने आगामी काळात शिवसेना आक्रमक भूमिका घेणार असल्याचे जाहीर करीत महाराष्ट्रात महाविकास आघाडी असली तरी रायगडात मात्र शिवसेना आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याचा नारा या बैठकीत आमदार महेंद्र थोरवे यांनी कार्यकर्त्यासमोर देत शिवसैनिकांनो कामाला लागा असा सल्ला दिला.


यावेळी आमदार महेंद्र थोरवे, जिल्हा सल्लागार नवीनदादा घाटवळ, गोविंद बैलमारे, उल्हास भुर्के, संपर्कप्रमुख पंकज पाटील, खालापूर पंचायत समिति सदस्य उत्तम परबलकर तालुकाप्रमुख संतोष विचारे, उपतालुकाप्रमुख संजय देशमुख, प्रविण पाटील, नरेंद्र तटकरे, संपर्कप्रमुख उमेश गावंड, समन्वयक एकनाथ पिंगळे, युवासेना जिल्हा चिटणीस प्रशांत खांडेकर, तालुका अधिकारी महेश पाटील, प्रवक्ते सुरेश देशमुख, प्रसिध्दीप्रमुख भाऊ सणस, कर्जत माजी उपसभापती मनोहर भोईर, महिला आघाडीच्या संघटक रेश्मा आंग्रे, अनिता पाटील, प्रिया जाधव, सुरेखा खेडकर, शैला भगत, सारिका निकम, सुप्रिया साळुंखे, नगरसेवक अमोल जाधव, संकेत भासे, शहरप्रमुख पदमाकर पाटील, जनार्दन थोरवे, देवेंद्र देशमुख, सरपंच अनिल जाधव, एस.एम.पाटील, रमेश पाटील, देहू म्हामुणकर, संदेश पाटील आदीसह शिवसेनेचे लोकप्रतिनिधी, शिसैनिक, शाखाप्रमुख, आजी – माजी पदाधिकारी, युवासैनिक, महिला आघाडी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisment -

You cannot copy content of this page