if(isset($image4)); {?>
} ?>
if(isset($image5)); {?>
} ?>
मावळ (प्रतिनिधी) : टाकवे बुद्रुक जवळील राजपुरी येथे सतीश हिलम यांचे घर जळून खाक झालेल्या संसाराच्या उभारणीसाठी दानशूर व्यक्तींनी मदतीचे हात सरसावले आहेत .
आदिवासी समाजाचे सतीश हिलम यांच्या घराला रविवार दि .30 रोजी मध्यरात्री दिव्याच्या वातीने पेट घेतल्याने घराला आग लागली होती . या आगीत त्यांचे संपूर्ण घर जळुन खाक झाले होते . घरावरील छप्परच हारवल्याने संपूर्ण कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला होता . या घटनेची माहिती परिसरात सर्वत्र पसरली असता पिडीत कुटुंबाला आधार देण्यासाठी काही दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन आगीत खाक झालेला संसार उभा करण्यासाठी मदतीचा हात देऊ केला आहे .
टाकवे गावचे माजी सरपंच बाळासाहेब कोकाटे यांच्याकडून 50 किलो तांदूळ, पिंपरी येथील गृहिणी सुनंदा निक्रड यांनी 1 हजार रुपये रोख रक्कम व टाकवे गावचे माजी उपसरपंच बाबाजी गायकवाड यांनी किराणा , कपडे आणि घराचे छप्पर साकारायला पत्रे , खांब आणि लोखंडी पाईप दिले आहेत .
यांसह ही घटना समजताच संस्कार प्रतिष्ठानच्या सभासदांनी 24 तासाच्या आत या कुटूंबाला लागणारा किराणा , गहु , ज्वारी , तांदुळ , विविध प्रकारच्या डाळी,विविध प्रकारच्या गृहोपयोगी वस्तू अंथरुण – पांघरूण घेण्यासाठी चादर , ब्लँकेट बेडशिटस , वापरण्यासाठी भांडी तसेच नवीन साड्या, पँट – शर्ट इत्यादी साहित्य जमा करुन त्या कुटुंबाला आधार देत एक महिना पुरेल एवढे साहित्य दिले आहे . यासाठी डॉ . मोहन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली नम्रता बांदल , रंजना जोशी , सुनिता गायकवाड , तनुजा ताकवले , विजय आगम , प्रभाकर मेरुकर , मनोहर कड , राहुल ढवळे , रंजना गोराणे यांनी सहकार्य केले . हा मोडलेला संसार उभा करण्यासाठी संकट प्रसंगी धावून आलेल्या सर्व दानशूर व्यक्ती व संस्थेचे हिलम कुटुंबीयांनी आभार व्यक्त केले आहेत.