Saturday, July 27, 2024
Homeपुणेवडगावआग्रा ते राजगड गरुडझेपेतील शिलेदारांचे नागराध्यक्ष मयूर ढोरे व वडगाव ग्रामस्थांच्या...

आग्रा ते राजगड गरुडझेपेतील शिलेदारांचे नागराध्यक्ष मयूर ढोरे व वडगाव ग्रामस्थांच्या वतीने जंगी स्वागत…

वडगाव दि.30 : आपल्या बुद्धीचातुर्याने गनिमीकावा आखत औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्र्याहून गरुडझेप घेत स्वराज्यात मूहर्तमेढ रोवली या घटनेस १७ ऑगस्ट २०२१ रोजी ३५५ वर्षे पूर्ण झाले यानिमित्ताने छत्रपती शिवरायांना वंदन करण्यासाठी तसेच महाराजांचे शिवशौर्य संपूर्ण जगाला कळावे या शिवकार्यासाठी वडगाव शहरातील गड भटकंती ग्रुपचे अध्यक्ष राजूभाऊ कुलकर्णी, गणेश जाधव, नितीन चव्हाण, हनुमंत जांभूळकर, शामराव ढोरे, अंकेश ढोरे, विशाल शिंदे, रविंद्र विनोदे, मनोज जाधव, अतुल ढोरे, गुरुदास मोहोळ, दत्ता म्हाळसकर, भार्गव बोरकर आणि इतर युवा सहकारी गरुडझेप या मोहिमेत सहभागी झाले होते.


वडगाव शहरातील तरूणांनी मध्यप्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र या चार राज्यांतून आग्रा ते राजगड गरुडझेप ही ऐतिहासिक मोहिम पूर्ण करुन वडगाव शहरात दाखल होताच या सर्व शिलेदारांची जंगी मिरवणूक काढून स्वागत करण्यात आले.


यावेळी काँग्रेस तालुकाध्यक्ष बाळासाहेब ढोरे, नायब तहसीलदार चाटे साहेब, पोलिस निरीक्षक विलासराव भोसले, पोटोबा महाराज देवस्थानचे विश्वस्त सोपानराव म्हाळसकर, मंगेशकाका ढोरे, सुभाषराव जाधव, सुनीलभाऊ चव्हाण, शिव व्याख्याते रविंद्र यादव सर, बापूसाहेब वाघवले, रावसाहेब चव्हाण, गोरखनाना ढोरे, अर्जुन आप्पा ढोरे, बिहारीलाल दुबे, नगराध्यक्ष मयूर ढोरे, नगरसेवक राजेंद्र कुडे, चंद्रजीत वाघमारे, राहुल ढोरे, शारदाकाकू ढोरे, माया चव्हाण, पुनम जाधव, आबासाहेब चव्हाण, सुरेश जांभूळकर, सुनील कोद्रे, सचिन ढोरे, अनिल ओव्हाळ, शरद ढोरे, रविंद्र काकडे, अमोल पगडे, राहुल नखाते, नितीन कुडे तसेच शहरातील महिला भगिनी, नागरिक आणि शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शहरात शिव स्मरण ज्योतीचे आगमन झाले असता जागोजागी महिला भगिनींनी या युवकांना औक्षण केले. तसेच व्यापारी बांधवांनी व ग्रामस्थांनी पुष्पवृष्टी करत सर्व शिलेदारांचे स्वागत केले.

- Advertisment -

You cannot copy content of this page