![]()
if(isset($image4)); {?>
![]()
} ?>
if(isset($image5)); {?>
![]()
} ?>
शेकापचे नेते नारायण डामसे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश सोहळा..
भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) पाच महिन्यांच्या विश्रांती नंतर पुन्हा एकदा कर्जत खालापूर मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष येथील नेते ” सुधाकर भाऊ घारे ” यांच्या नेतृत्वाखाली एकवटला असून महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तथा कोकणचे भाग्य विधाते खासदार सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली गरुड भरारी घेणार आहेत . त्यानिमित्ताने बुधवार दिनांक ९ एप्रिल २०२५ रोजी सायं. ५ वाजता रॉयल गार्डन , कर्जत येथे भव्य कार्यकर्ता संवाद मेळावा आयोजित केला असून या मेळाव्यात शेतकरी कामगार पक्षाचे नेते तथा राजिप चे माजी समाज कल्याण सभापती नारायण डामसे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश करणार असल्याने या मेळाव्याकडे संपूर्ण मतदार संघाचे लक्ष लागून आहे.
झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत सुधाकर भाऊ घारे यांनी अपक्ष उमेदवारी परिवर्तन विकास आघाडी स्थापन करून लढवली होती , त्यावेळी येथील सर्व राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे प्रदेश अध्यक्ष यांच्याकडे पाठवले होते . मात्र निवडणुकीत पराभूत होऊनही तब्बल पाच महिने कर्जतमध्ये संपर्क कार्यालयाचे बॅनर ढाकलेल्या अवस्थेत होते . तटकरे साहेब आमचे नेते आहेत , पण आम्ही त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते नाहीत , आमची पुढील राजकीय लढाई परिवर्तन आघाडीचे माध्यमातून असेल , असे पत्रकार परिषदेत देखील सुधाकर भाऊ घारे यांनी मत व्यक्त केले होते , मात्र या दरम्यान त्यांचे राजीनामे नामंजूर केल्याने पुन्हा एकदा ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सूत्रे हाती घेणार असून त्यानिमित्ताने भव्य संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या मेळाव्यास मा.श्री. सुनिलजी तटकरे खासदार तथा प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी , मा.ना.श्री. नरहरी झिरवळ – मंत्री, अन्न आणि औषध प्रशासन , अदितीताई तटकरे – मंत्री, महिला व बालकल्याण , मा. सुनिल अण्णा शेळके – आमदार मावळ विधानसभा , मधुकर पाटील – जिल्हाध्यक्ष , दत्तात्रेय मसुरकर – प्रदेश सरचिटणीस, भगवान शेठ भोईर – प्रदेश प्रतिनिधी, अशोक भोपतराव – प्रदेश सरचिटणीस, उमाताई मुंडे – महिला जिल्हाध्यक्षा , भरतभाई भगत – प्रदेश सरचिटणीस ,अंकित साखरे – युवक जिल्हाध्यक्ष, त्याचप्रमाणे कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते , महिला आघाडी , युवती आघाडी , सर्व सेल कमिटी यांनी उपस्थित रहावे , असे आवाहन स्वागतोत्सुक श्री. सुधाकर भाऊ परशुराम घारे – मा. उपाध्यक्ष तथा सभापती, राजिप व निमंत्रक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कर्जत – खालापूर विधानसभा मतदारसंघ यांनी केले आहे .