Sunday, September 24, 2023
Homeमहाराष्ट्ररायगडआडोशी धरणामध्ये बुडालेल्या दिल्लीतील युवकाचा मृत्यूदेह सापडला.

आडोशी धरणामध्ये बुडालेल्या दिल्लीतील युवकाचा मृत्यूदेह सापडला.


खालापूर.अफताब शेख(,वय 30) रा. दिल्ली हा तरुण मित्रांसोबत खालापुर तालुक्यातील आडोशी येथील धरणा शेजारी असलेल्या फार्म मध्ये मित्रांसोबत पर्यटनासाठी आला होता.

परंतु 14 मार्च रोजी पहाटे पासुन गायब होता. फार्म हाऊस मधुन गायब असलेल्या अफताब शेखचे कपडे, पाकिट धरणा शेजारी भेटल्याने आडोशी धरणात अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी टीमने पोलिस प्रशासनाच्या मदतीने शोध मोहीम सुरु केल्याने अखेर 15 मार्च सकाळच्या सुमारास आडोशी धरणामध्ये बुडालेल्या दिल्लीतील युवकाचा मृत्यूदेह सापडला असून अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी संस्थेच्या सदस्यांनी खोपोली पोलीसांच्या मार्गदर्शनाखाली मृतदेह काढुन पोलीसांच्या ताब्यात दिले.

- Advertisment -