आढले मावळ येथील दोन मित्रांमध्ये झालेल्या भांडणात एकाचा मृत्यू तर एक जखमी…

0
844

मावळ दि. 21 – शिरगाव पोलीस स्टेशन हद्दीतील आढले गावातील दोन मित्रांमध्ये झालेल्या भांडणात तीन गोळया लागून एकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी दि.21 रोजी सकाळी 11 वाजता घडली आहे.

शिरगाव पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादातून दोन मित्रांमध्ये भांडण झाले. एकाने दुसऱ्या मित्रावर धारदार हत्याराने वार केले. यात जखमी झालेल्या मित्राने देखील पिस्तूल काढत थेट मित्रावर तीन गोळ्या झाडून त्याचा खून केला.

रोहन येवले (वय 21, रा. आढले खुर्द, मावळ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर अविनाश भोईर (वय 23, रा. आढले खुर्द, मावळ) हा गंभीर जखमी झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली .

आरोपी अविनाश भोईर आणि मयत रोहन येवले हे एकमेकांचे चांगले मित्र होते. दोन दिवसांपूर्वी त्यांच्यात भांडण झाले होते. त्या भांडणाचे कारण अद्याप समोर आले नाही. त्याच रागातून आज पुन्हा दोघांचे भांडण झाले. रोहन याने अविनाशवर धारदार शस्त्राने वार केले. त्यात अविनाश जखमी झाला. त्यानंतर अविनाश याने पिस्तूल काढले आणि रोहनवर तीन गोळ्या झाडत त्याचा खून केला.

जखमी अविनाश याला हिंजवडी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.पुढील तपास शिरगाव पोलीस करत आहेत.