Thursday, November 21, 2024
Homeपुणेमावळआढे येथे नदीपात्रात वाहून गेलेल्या तरुणाचा दोन दिवसानंतर सापडला मृतदेह..

आढे येथे नदीपात्रात वाहून गेलेल्या तरुणाचा दोन दिवसानंतर सापडला मृतदेह..

मावळ (प्रतिनिधी): मावळ तालुक्यातील आढे येथे नदी ओलांडत असताना एक व्यक्ती नदीच्या प्रवाहात वाहून गेला.ही घटना दि.20 रोजी उघडकीस आली. शिवदुर्गं मित्र लोणावळा, आपदा मित्र व वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या सदस्यांनी दोन दिवस शोध मोहीम राबवत तरुणाचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला.
श्री बोरकर हे आढे येथे नदी ओलांडून जात असताना पाण्यात वाहून गेले. याबाबत माहिती मिळाल्यानंतर शिवदुर्ग रेस्क्यू टीम लोणावळा,आपदा मित्र, वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या सदस्यांनी आढे येथे धाव घेतली. बुधवार दि. 20 रोजी दिवसभर शोध घेतला मात्र वाहून गेलेला व्यक्ती सापडला नाही. दुसऱ्या दिवशी देखील त्याचा शोध घ्यावा,अशी विनंती नातेवाईकांनी केली.

त्यानुसार गुरुवार दि. 21 रोजी देखील सकाळपासून शोधकार्य पुन्हा सुरु करण्यात आले.रेस्क्यू पथकाने दूरपर्यंत शोध घेतला. गुरुवारी दुपारी चार ते पाच किलोमीटर अंतरापर्यंत शोध घेतल्यानंतर बेबडओव्हाळ गावच्या हद्दीत नदीत लावलेल्या पाण्याच्या मोटरच्या दोरीला मृतदेह अडकला होता.
शिवदुर्गं मित्र लोणावळा व वन्यजीव रक्षक संस्थेचे निलेश गराडे,अनिल आंद्रे, दक्ष काटकर, विनय सावंत, गणेश गायकवाड, शत्रुघ्न रासणकर, रमेश कुंभार, संतोष दहिभाते, शुभम काकडे यांनी मृतदेह बाहेर काढून पोलिसांच्या ताब्यात दिला आहे. वडगाव मावळ पोलीस पुढील तपास करत आहेत.
- Advertisment -

You cannot copy content of this page