Tuesday, September 26, 2023
Homeमहाराष्ट्ररायगडआत्करगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी प्रदीप शिंदे यांची निवड..

आत्करगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी प्रदीप शिंदे यांची निवड..

(खोपोली- दत्तात्रय शेडगे)
खालापुर तालुक्यातील प्रतिष्टेची असलेल्या आत्करगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी प्रदीप शिंदे यांची बिनविरोध निवड झाली, खालापूर तालुक्यात नेहमीच विकासकामे करण्यात अग्रेसर असणाऱ्या अत्करगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदि असलेल्या मालती गायकवाड यांचा कार्यकाळ संपल्याने रिक्त झालेल्या उपसरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आली यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून सरपंच सिमा नितीन तवले यांच्या अध्यक्षतेखाली प्रदीप शिंदे यांचा एकमेव अर्ज आल्याने शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

यावेळी जिल्हापरिषद सदस्य नरेश पाटील यांच्या हस्ते शिंदे यांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर प्रदीप शिंदे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला असून यावेली हा क्षण बच्चे कंपनीने केक कापून साजरा करण्यात आला.

प्रदीप शिंदे यांची अत्करगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी प्रदीप निवड झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसत होता यावेली सरपंच सीमा नितीन तवले ,माजी उपसरपंच तथा सदस्य समीर देशमुख, दत्तात्रय शेडगे, मालती गायकवाड, जनीता वाघमारे, ग्रामसेवक, पवार, उपसरपंच निकेश देशमुख, प्रकाश पाटील, आरपीआयचे युवक जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड, अजित देशमुख, सुनील सुखदरे, सामाजिक कार्यकर्ते, नितीन तवले, नितीन पाटील, अनंत निरगुलकर,रमेश पाटील, रोशन देशमुख यांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते

- Advertisment -