Wednesday, September 27, 2023
Homeमहाराष्ट्ररायगडआत्मनिर्भर भारताच्या दिशेने कर्जतकरांच्या वाटचालीस केंद्रीयमंत्री नारायण राणे यांची साथ..

आत्मनिर्भर भारताच्या दिशेने कर्जतकरांच्या वाटचालीस केंद्रीयमंत्री नारायण राणे यांची साथ..

भिसेगाव-कर्जत(सुभाष सोनावणे)
मुंबई – पुणे रेल्वे मार्गावरील मध्य असलेले कर्जत तालुका हा व्यापारी दृष्टिकोनातून दळणवळण करण्यासाठी योग्य ठिकाण आहे.म्हणूनच येथे छोटे – मोठे उद्योगधंदे झाल्यास नक्कीच भरभराटीस येऊन भावी पिढी व महिला देखील उद्योजक म्हणून भविष्यात उदयास येतील, हा महत्वाचा मानस मनात आखून त्या दिशेने वाटचाल केल्यास कर्जतकरांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी केंद्रीय लघु आणि सूक्ष्म उद्योगमंत्री मा.नारायणजी राणे यांची साथ मिळणार असून नुकतीच भारतीय जनता पक्षाचे किसान मोर्चा कोकण संघटक सुनील गोगटे यांनी दिल्ली येथील त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.

यावेळी झालेल्या चर्चेत कर्जत खालापूर तालुक्यातील विविध भागात लघु आणि सूक्ष्म उद्योग उभे करण्यासाठी मागणी करण्यात आली,जेणेकरून या भागातील महिला आणि तरुण उद्योजकाना प्रोत्साहन मिळेल व आत्मनिर्भर भारताच्या दिशेने कर्जतकरांची वाटचाल सुरु होईल.

नवतरुण भावी पिढी आणि शिक्षित युवती व महिला आपले छोटे छोटे ,सूक्ष्म व्यापार उद्योग सुरू करू शकतील तसेच यानिमित्ताने रोजगार निर्मिती देखील होईल ,अशी चर्चा करण्यात आली.या सर्व मागणीस केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी अतिशय चांगला प्रतिसाद दिला आणि तुम्ही जागा निवडा ,प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करा ,मी केंद्र सरकारकडून जास्तीत जास्त मदत देऊ करतो,असे आश्वासन त्यांनी दिले.

यावेळी संघटक सुनील गोगटे यांनी त्यांचे मनस्वी आभार व्यक्त केले तर आपल्या मदतीने नक्कीच कर्जतकरांना व्यापारी व उद्योग क्षेत्रात गरुड भरारी घेण्यास वाव व दिलासा मिळेल असे मत व्यक्त केले.याप्रसंगी भाजप नेते तथा किसान मोर्चा कोकण संघटक सुनील गोगटे यांच्या सोबत कर्जत तालुका सरचिटणीस राजेश भगत , अक्षय सर्वगोड आदी उपस्थित होते.

- Advertisment -