
लोणावळा आदिवासी भटका बुहुजन संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा लेखी निवेदनामार्फत मावळ तहसीलदार यांना देण्यात आला आहे. त्यासंदर्भात संस्थापक अध्यक्ष माऊली सोनवणे यांनी मावळचे तहसीलदार यांना लेखी निवेदन दिले आहे.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या घोषनेनुसार आदिवासी कुटुंबांना खादय मिळाले नाही. शासनाकडे वारंवार निवेदन देऊनही शासनाच्या कोणत्याही अधीकाऱ्या कडून याची दखल घेतली जात नाही. मग राज्य शासनाने घोषित केलेल्या लॉक डाऊनमध्ये ह्या आदिवासी कुटुंबांना वाली कोण, का शासकीय अधिकारी यांच्याकडे दुर्लक्ष करत आहेत.
आज लोणावळा खंडाळा परिसरातील अनगीनत आदिवासी कुटुंब शासनाच्या अनेक सुविधांपासून वंचित आहेत.तरी कोरोनाच्या अशा गंभीर परिस्थितीत आदिवासी कुटुंब काय खातील, कसा आपला उदरनिर्वाह करतील याचे गांभीर्य शासनाने लक्षात घेऊन सर्व आदिवासी कुटुंबांना त्यांच्या हक्काचे अन्न धान्य शासनामार्फत पुरविण्यात यावे अन्यथा मावळ तहसील कार्यालयासमोर आमरणउपोषण करण्यात येईल असा इशारा निवेदना मार्फत आदिवासी भटका बहुजन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माऊली सोनवणे यांनी तहसील कार्यालयाला दिला आहे.
तरी जिल्हाधिकारी पुणे, मावळ तहसीलदार तसेच मावळचे आमदार यांनी ह्या आदिवासी कुटुंबांचा विचार करावा असे सोनवणे यांनी बोलताना सांगितले.