if(isset($image4)); {?>
} ?>
if(isset($image5)); {?>
} ?>
खोपोली(दत्तात्रय शेडगे)देशात कोरोनाने हाहाकार माजवला असून सगळीकडे लॉक डाऊन जाहीर असल्याने यात गोर गरीब आदिवासी बांधवांचे हाल होत आहेत.
याची दखल मानव संरक्षण समिती खालापूर, आणि खोपोली यांच्या वतीने प्रकाश नगर आणि गगनगिरी आदिवासीवाडी येथील मुलांसह बांधवाना बिस्कीट वाटप करून सामाजिक बांधिलकी जपली ,कोरोना काळात मानव संरक्षण समितीने केलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.यावेळीं मानव संरक्षण समितीच्या खालापूर तालुका महिला जनसंपर्क अधिकारी सुखदा सुरेंद्र बने, खालापूर तालुका अध्यक्षा कुंदा सीताराम वजरकर, खालापूर तालुका कायदेशीर सल्लागार ऍड सुजाता सचिन परदेशी, सचिव अनिल शेडगे आदी उपस्थित होते.