लोणावळा दि.१७ : रोजी आदीवासी भटका बहूजन संघटना महाराष्ट्र राज्य यांचा खंडाळा शाखेचा १५ वा वर्धापन दिन खंडाळा येथे साजरा करण्यात आला.
याप्रसंगी सभेचे अध्यक्ष पै. चंद्रकांत सातकर, प्रमुख मार्गदर्शक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माऊली तथा ज्ञानदेव सोनवणे यांनी देशाच्या ७३ वर्षाच्या स्वातंत्र्यातील विकास उदासिनता व्यक्त करत लोणावळा नगरपरिषदेच्या मुळे खंडाळा आदीवासी ठाकुरवस्तीचा विकास झालाच नाही.
वार्षिक नगरपरिषदेचे विविध कर भरून देखील ठाकुरवाडी रहिवाशांना प्राथमिक गरजा रस्ता ,पाणी, लाईट अध्यापही पुरेशा नसून येथील विकास होणे गरजेचे आहे. पर्यटन विकासाच्या नावावर ठाकुरवाडी रहिवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
शहराच्या विकासाबरोबर स्थानिक रहिवासी सुखावला पाहिजे इत्यादी सारख्या मागण्या नगरपरिषद प्रशासनाकाडे करण्यात आली. याप्रसंगी मा. उपनगराध्यक्ष प्रमोद गायकवाड , मा. नगरसेवक भालचंद्र खराडे , पै. संभाजी राक्षे , अनिता वाघमारे , माडेताई, मनिष माडे , राजेश भल्ला इ . कार्यकर्ते तसेच आदिवासी बंधू भगिनी मोठया प्रमाणात उपस्थित होते .