Saturday, December 21, 2024
Homeपुणेलोणावळाआद्य क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे यांची 228 वी जयंती लोणावळ्यात साजरी…

आद्य क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे यांची 228 वी जयंती लोणावळ्यात साजरी…

लोणावळा (लोणावळा) : महाराष्ट्र मातंग समाज लोणावळा शहराच्या वतीने आद्य क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांची 228 वी जयंती मातंग समाज लोणावळा शहराध्यक्ष सोमनाथ जयसिंग बोभाटे यांच्या अध्यक्षतेखाली साजरी करण्यात आली.समाजातील नागरिकांनी लहुजी उस्ताद यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत व जयघोष करत जयंती साजरी करण्यात आली .
यावेळी उपाध्यक्ष विकास साठे , पुणे जिल्हा कोर कमिटी लहुजी शक्ती सेना अध्यक्ष अशोक बोभाटे , शाम बोभाटे , कार्याध्यक्ष विजय साबळे , उदय बोभाटे , महर्षी वाल्मिक समाज उपाध्यक्ष विकी उटवाल , सुनील बोभाटे , निलेश लांडगे , मधुकर बोभाटे , सुधीर साबळे , प्रमोद बोभाटे , रीतेश बोभाटे , अविनाश पळणीटकर , विकास साबळे , किरण बोभाटे , प्रवीण मखरे , विनोद साबळे , सुमित बोभाटे आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच शिवाजीनगर संगमवाडी येथील आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या समाधीस्थळी जाऊन मातंग समाज लोणावळा शहराच्या वतीने पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
- Advertisment -

You cannot copy content of this page