Thursday, September 28, 2023
Homeपुणेलोणावळाआद्य पत्रकार दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती लोणावळ्यात साजरी....

आद्य पत्रकार दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती लोणावळ्यात साजरी….

लोणावळा दि. 6 : दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती देशभरात साजरी केली जात असून 6 जानेवारी हा दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती लोणावळा पत्रकार भवन येथे साजरी करण्यात आली.

लोणावळा शहर पत्रकार संघ व दैनिक मराठी पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य यांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेची पूजा करून पुष्प अर्पण करण्यात आले. त्यावेळी भाजप चे शहराध्यक्ष रामविलास खंडेलवाल, मावळवार्ता फौंडेशनचे अध्यक्ष सचिन पारेख, संजय अडसुळे, नगरसेवक निखिल कवीश्वर, नगरसेवक पत्रकार विशाल पाडाळे, लोणावळा शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पाटील, मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष विशाल विकारी, जेष्ठ पत्रकार श्रीराम कुमठेकर, पत्रकार प्रशांत पुराणिक, संदीप मोरे, संतोषी तोंडे, सुनील म्हस्के, नितीन तिकोने, बंडू येवले,नरेश बोरकर, गोपी मानकर उपस्थित होते.

सदर कार्यक्रमात लोणावळा शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पाटील, मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष विशाल विकारी, नगरसेवक पत्रकार विशाल पाडाळे यांना उपस्थित मान्यवर रामविलास खंडेलवाल व सचिन पारेख यांच्या हस्ते पुष्प गुच्छ देऊन सर्व पत्रकार बांधवांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. अध्यक्ष विशाल विकारी यांनी आभार मानले तर प्रशांत पुराणिक यांनी सूत्रसंचालन केले.

- Advertisment -