Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडआपटा ग्रामपंचायतच्या सदस्य पदासाठी संगीता बावदाणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल..

आपटा ग्रामपंचायतच्या सदस्य पदासाठी संगीता बावदाणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल..


खोपोली-दत्तात्रय शेडगे.

पनवेल तालुक्यातील अतिशय प्रतिष्ठचे असलेल्या ग्रुप ग्रामपंचायत आपटा या ग्रामपंचायतच्या सदस्य पदासाठी वार्ड क्रमांक एक चे शिवसेना शेकाप आघाडीचे उमेदवार संगीता लक्ष्मण बावदाने यांनी आज आपला उमेदवार अर्ज दाखल केला आहे.


आपटा ग्रामपंचायतची निवडणूक 15 जानेवारी रोजी होणार आहे, यासाठी आज वार्ड क्रमांक एक साठी शिवसेना शेकाप आघाडी कडून अधिकृत उमेदवार संगीता लक्ष्मण बावदाने यांनी आज उमेदवार अर्ज दाखल केला आहे, तालुक्यातील सगळ्यात प्रतिष्टेची आपटा ही गृप ग्रामपंचायत ओळखली जात असून हिची निवडणूक नुकतीच होणार आहे, यासाठी आज वार्ड क्रमांक एक साठी आज शिवसेना शेकाप आघाडी कडून संगीता लक्ष्मण बावदाणे यांची आपला उमेदवार अर्ज दाखल केला आहे.


यावेळी शिवसेना पनवेल उपतालुका प्रमुख अशोक थोरवे, जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर घरत, आपटा शाखाप्रमुख राजेंद्र घोलप, सारसई शाखाप्रमुख लक्ष्मण बावदाणे, केलवणे विभाग युवा सेना अधिकारी स्वप्नील भोवड, माजी ग्रामपंचायत सदस्य ऋषभ धुमाळ, माजी सरपंच मारुती कुराडे, लक्ष्मण कोकरे, मारुती कोकरे, अनिल शिद, सीताराम कुराडे, रणजित पवार, महेंद्र पवार, गणेश पवार, लक्ष्मण वाघे, बाबू ढेबे, भास्कर ढेबे, अंकुश ढेबे आदी उपस्थित होते.

- Advertisment -

You cannot copy content of this page