आपटा ग्रामपंचायतच्या सरपंचपदी शेकापच्या निकिता भोईर तर उपसरपंच पदी शिवसेनेचे वृषभ धुमाळ..

0
257


खोपोली- दत्तात्रय शेडगे

पनवेल तालुक्यातील अतिशय प्रतिष्ठची असलेल्या ग्रुप ग्रामपंचायत आपटा या ग्रामपंचायतच्या सरपंचपदी शेकापच्या निकिता दर्शन भोईर, तर उपसरपंचपदी शिवसेनेचे वृषभ धुमाळ यांची बिनविरोध निवड झाली.

आपटा गृप ग्रामपंचायतची सार्वत्रिक निवडणूक नुकतीच पार पडली असून आज सरपंच उपसरपंच पदाची निवडणूक पार पडली यामध्ये सरपंच पदासाठी शेकापच्या निकिता दर्शन भोईर तर उपसरपंच पदासाठी शिवसेनेच्या वृषभ धुमाळ यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता यावेळी सरपंच पदासाठी निकिता भोईर यांचा तर वृषभ धुमाल यांचा उपसरपंच पदासाठी एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सरपंच आणि उपसरपंच पदी बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले.

सरपंच आणि उपसरपंच यांची निवड होताच त्यांची गावातून ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली.यावेळी शेकापचे आठ शिवसेनेचे तीन व भाजपचे दोन सदस्य निवडून येत आपटा ग्रामपंचायत वर महाविकास आघाडीचा झेंडा फडकला, यावेळी नवनिर्वाचीत ग्रामपंचायत सदस्य मारुती अशोक चव्हाण, नाजनिन खलील पटेल, संगीता लक्ष्मण बावदाणे ,गीता राजू देशमुख, वंदना शरद वाघे, आसद पिठू, मयूर शेलार, दामू मांडे, पांडुरंग लेंडे, शिवसेना तालुका प्रमुख रघुनाथ पाटील, विभाग प्रमुख भरत घरत, शेकाप विभाग चिटणीस संतोष पाटील, केलवणे युवासेना जिल्हा परिषद अधिकारी स्वप्नील भोवड, उपतालुका प्रमुख अशोक थोरवे, शाखाप्रमुख राजेंद्र घोलप, माजी पंचायत समिती सदस्य गणेश सावंत ,दत्ता पाटील ,गोपाळ सावंत, सारसई शाखाप्रमुख लक्ष्मण बावदाने आदीसह अनेक शेकाप ,शिवसेना आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.