Wednesday, September 27, 2023
Homeमहाराष्ट्ररायगडआपटा ग्रामपंचायत मध्ये राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची प्रतिमेची स्थापना..

आपटा ग्रामपंचायत मध्ये राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची प्रतिमेची स्थापना..

ग्रामपंचायत सदस्या संगीता बावदाने यांच्या प्रयत्नाना यश.

खोपोली(दत्तात्रय शेडगे)
धनगर समाजाचे आराध्य दैवत असलेले राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून आज ग्रामपंचायत कार्यालयात लावण्यात आली.पनवेल तालुक्यातील सगळ्यात प्रतिष्टेची ही ग्रामपंचायत असून या ग्रामपंचायत मध्ये धनगर समाजाचे अनेक घरे असून येथे धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने राहतात.

मात्र धनगर समाजाचे दैवत असलेले पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची प्रतिमा नव्हती, यांची दखल नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्या संगीता लक्ष्मण बावदाने यांनी घेत आज ग्रामपंचायत कार्यालयात अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून लावण्यात आली, या कामामुळे तालुक्यातील सर्वच धनगर समाज बांधवांनी आनंद व्यक्त केला आहे.

यावेळी आपटा ग्रामपंचायतच्या सरपंच निकता दर्शन भोईर, उपसरपंच वृषभ धुमाळ, सदस्य मारुती चव्हाण, मयूर शेलार, मारुती चव्हाण, असद पिठू,युवासेना केळवने जिल्हा परिषद विभाग अधिकारी स्वप्नील भोवड, शाखाप्रमुख लक्ष्मण बावदाने, राज देशमुख भास्कर ढेबे दर्शन भोईर आदी उपस्थित होते

- Advertisment -