आपटा ग्रुपग्रामपंचायतच्या महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ फुटला..

0
207

महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची उपस्थिती…..

खोपोली- दत्तात्रय शेडगे

पनवेल तालुक्यातील अतिशय प्रतिष्ठेची असलेल्या आपटा ग्रुप ग्रामपंचायतच्या शिवसेना शेकाप या महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ आज प्रमुख नेत्यांच्या उपस्थित नारळ फोडून प्रचाराला सुरुवात करण्यात आली
आपटा ग्रामपंचायतची सार्वत्रिक निवडणूक 15 जानेवारी २०२१ पार पडणार असून यावेळीं शिवसेना – शेकाप यांची महाविकास आघाडी झाली असून यांच्या प्रचाराची आज पासून सुरुवात करण्यात आली.


शिवसेना शेकाप महाविकास आघाडीचे वार्ड क्रमांक एक (०१)मधून संगीता लक्ष्मण बावदाणे ,हेमा चंद्रकांत शिद, पांडुरंग लेंडे, वार्ड क्रमांक दोन(०२) मधून आसद पिठू, नाजनींन पटेल, वार्ड क्रमांक तीन(०३) मधून वृषभ वामन धुमाल, वंदना वाघे, वार्ड क्रमांक चार(०४) मधून मारुती चव्हाण माधवी कदम, दामा मांडे, वार्ड क्रमांक पाच(०५) मधून मयूर शेलार, निकिता भोईर, गिता देशमुख हे उमेदवार उभे असून यांना प्रचंड मतांनी विजयी करा असा निश्चय यावेळी करण्यात आला.


यावेळीं जिल्हा परिषद ज्ञानेश्वर सदस्य घरत,शिवसेना उपतालुका प्रमुख अशोक थोरवे, केलवणे जिल्हा परिषद युवासेना अधिकारी स्वप्नील भोवड, अभिनव फुलमाली, रोहन भोईर, शाखा प्रमुख राजेंद्र घोलप, संजय आंबवणे, गणेश सावंत, भय्याज भाई ,समीर मुल्ला, खलील पटेल, सारसाई शाखाप्रमुख लक्ष्मण बावदने, आत्माराम मेहतर, मधुकर भोईर, दत्तात्रय पाटील, अमृत सोनवणे, रईस पिठू, गणेश थोरवे, शनिवार उघडा, दामू वाघे, गोखर लेंडे, मारुती कोकरे, राजेश उघडा, भास्कर ढेबे, गणेश पवार, रणजित पवार, सखाराम पाटील, सुरेश वगरे, गोपाळ सावंत, पुष्पा सकपाळ, महादेव कदम आदींसह अनेक महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.