आपटी ग्रामपंचायत वार्ड क्रमांक दोन मधून वाघू कोकरे तिसऱ्यांदा बिनविरोध..

0
257

वाघू कोकरे यांनी मारली हॅट्रिक..

प्रतिनीधी-दत्तात्रय शेडगे

मावळ तालुक्यातील प्रतिष्ठची असलेल्या ग्रुप ग्रामपंचायत आपटी वार्ड क्रमांक दोन मधून वाघू बाळू कोकरे यांची तिसऱ्यांदा बिनविरोध सदस्य म्हणून निवड झाली.

मावळ तालुक्यातील सह्याद्रीच्या कुशीत आपटी ही ग्रुप ग्रामपंचायत असून तिची निवडणूक 15 जानेवारी रोजी पार पडणार आहे, येथे अनेक मातब्बर राजकीय नेत्यांनी ग्रामपंचायत ताब्यात येण्या साठी जोरदार तयारी केली आहे.

मात्र येथील वार्ड क्रमांक दोन मधून सामाजिक कार्यकर्ते तथा माजी सरपंच वाघू बाळू कोकरे यांची पुन्हा बिनविरोध सदस्य पदी निवड झाली,वाघू बाळू कोकरे यांची तिसऱ्यांदा बिनविरोध निवड झाल्याने त्यांना हॅट्रिक होण्याचा मान मिळाला असून सर्वच स्तरातुन त्यांचे अभिनंदन होत आहे.