Thursday, May 30, 2024
Homeपुणेलोणावळाआमची लोणावळा खंडाळा टॅक्सी चालक मालक संघटना फक्त व्यावसायिक,अध्यक्ष अमोल शेडगे…

आमची लोणावळा खंडाळा टॅक्सी चालक मालक संघटना फक्त व्यावसायिक,अध्यक्ष अमोल शेडगे…

लोणावळा (प्रतिनिधी): लोणावळा खंडाळा चालक-मालक टॅक्सी असोसिएशन ही एक नोंदणीकृत संघटना आहे.या संघटनेचा कोणत्याही राजकीय पक्षाशी कुठलाही संबंध नसून ही संघटना लोणावळा व खंडाळा परिसरामधील टुरिस्ट व्यवसाय करणाऱ्या टॅक्सी चालक व मालकांचे प्रतिनिधित्व करणारी संघटना आहे. त्यामुळे टॅक्सी चालक मालक यांनी कोणत्याही प्रकारचा संभ्रम करून घेऊ नये याबाबतचे निवेदन लोणावळा खंडाळा टॅक्सी चालक मालक असोसिएशनचे अध्यक्ष अमोल परशुराम शेडगे यांनी प्रसिद्ध केले आहे.
महाराष्ट्र वाहतूक सेना संलग्न लोणावळा खंडाळा टॅक्सी चालक मालक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महेश केदारी यांनी नुकतीच नूतन कार्यकारिणी जाहीर केली असल्यामुळे टॅक्सी चालक मालक असोसिएशन मध्ये संभ्रम निर्माण झाला असल्यामुळे हे निवेदन प्रसिद्ध करण्यात येत आहे.
लोणावळा खंडाळा टॅक्सी चालक मालक असोसिएशन ही संघटना नोंदणीकृत असून संघटनेचा रजिस्टर नोंदणी क्रमांक 53/2020 असा आहे.
9 मे 2023 रोजी महाराष्ट्र वाहतूक सेना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष महेश केदारी यांनी महाराष्ट्र वाहतूक सेना संलग्न लोणावळा खंडाळा टॅक्सी चालक-मालक संघटनेची नूतन कार्यकारिणी नुकतीच जाहीर केली आहे.टॅक्सी चालक मालक ही संघटना नक्की कोणाची या प्रकारच्या संभ्रमाचे वातावरण सध्या चालक-मालक यांच्यामध्ये निर्माण झाले आहे.याकरिता अध्यक्ष अमोल शेडगे यांनी या निवेदनाद्वारे सर्व टॅक्सी चालक-मालक यांना सूचित केले आहे की लोणावळा खंडाळा चालक-मालक टॅक्सी असोसिएशन व महाराष्ट्र वाहतूक सेना संलग्न लोणावळा खंडाळा टॅक्सी चालक-मालक संघटना ह्या दोन्ही वेगवेगळ्या संघटना आहेत. या दोन्हींचा परस्परांशी काहीही संबंध नाही.
लोणावळा खंडाळा चालक-मालक टॅक्सी असोसिएशन ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न संघटना नाही. सर्व समाजातील व सर्व राजकीय पक्षांमध्ये काम करणारे युवक यांनी एकत्र येऊन लोणावळा शहरात टुरिस्ट व्यवसाय करण्यासाठी व एकजुटीने राहण्यासाठी या संघटनेची स्थापना केलेली आहे. याची सर्वांनी नोंद घ्यावी व मनामध्ये कोणताही संभ्रम ठेवू नये.

तसेच दोन्ही संघटना ह्या वेगवेगळ्या आहेत. महाराष्ट्र वाहतुक सेना यांनी संलग्न पदाधिकारी नियुक्त करताना लोणावळा खंडाळा टॅक्सी चालक मालक हे नाव वापरल्याने हा गोंधळ झाला असल्याचे अध्यक्ष अमोल शेडगे यांनी निवेदनामार्फत कळविले आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page