Friday, June 20, 2025
Homeमहाराष्ट्ररायगड" आमच्या नेत्यावर टीका कराल तर आम्ही सोडणार नाही "

” आमच्या नेत्यावर टीका कराल तर आम्ही सोडणार नाही “

राष्ट्रवादीच्या रणरागिणी ” सुरेखा खेडकर ” यांची आमदार थोरवेंवर आगपाखड !

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) आमदार महेंद्र थोरवे यांची ती जुनी सवय आहे , स्वतःच्या वाढदिवसाला आदिती ताईंच्या विरोधात म्हटला आता मंत्री भरत गोगावले यांच्या वाढदिवसाला खासदार सुनील तटकरे साहेबांवर टिका केली , आमच्या नेत्यावर टीका कराल तर आम्ही सोडणार नाही , तटकरे साहेब ” मुर्दा दिल ” नाही तर या राज्याचा – जिल्ह्याचा विकास व्हावा म्हणून संसद भवनात पोट तिडकीने विषय मांडतात , तुमची ओळख ” गद्दार ” म्हणून आहे , असा घणाघाती आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रणरागिणी तथा महिला विधानसभा अध्यक्षा सुरेखा खेडकर यांनी कर्जत येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संपर्क कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केला.


यावेळी या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे नेते तथा राजिप चे मा. उपाध्यक्ष सुधाकर भाऊ घारे , प्रदेश महासचिव भरत भाई भगत , युवक जिल्हाध्यक्ष अंकित साखरे , खालापूर अध्यक्ष संतोष बैलमारे , जिल्हा उपाध्यक्ष ऍड. पूजा सुर्वे , जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ दादा धुळे , जिल्हा संघटक दिपक श्रीखंडे , रवि झांजे , मा. सभापती धोंडू राणे , जुआरी, मा. नगरसेवक सोमनाथ आप्पा ठोंबरे , दिलीप गुरव , मा. नगरसेविका मधुरा चंदन , मा. नगरसेविका सुवर्णा निलधे , युवा अध्यक्ष स्वप्नील पालकर , जयेंद्र देशमुख , युवा नेते केतन बेलोसे , सोमनाथ पालकर , कडू , मनिषा ठोंबरे , हरपुडे , त्याचप्रमाणे कर्जत खालापूर मधील अनेक पदाधिकारी उपस्थित होते.


यापुढे त्यांनी सांगितले की , आम्ही सत्तेत आलो तर सर्व सामन्यांची कामे व्हायला लागली , आमदार थोरवे तर कार्यकर्त्यांना देखील सोडत नाही , त्यांना कामे दिली जात नाहीत , तुमच्यावर ” वारकरी संप्रदायाचे ” संस्कार असते तर तटकरे साहेबांवर अशी टीका केली नसती , यावर प्रकाश टाकत , तटकरे साहेबांना माज आला नाही तर निवडून आल्यावर तुम्ही दंड थोपटले होते म्हणून तुम्हाला ” माज ” आला आहे. यापुढे जर आमच्या नेत्यांना बोलाल तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही , जशास तसे उत्तर दिले जाईल , अशी आगपाखड त्यांनी आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर केली . मंत्री आदिती ताई या ” फ्लॉवर ” नाही तर ” पॉवर ” आदिती ताई तटकरे आहेत , असा संतापजनक मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला विधान सभा अध्यक्ष सुरेखा खेडकर यांनी व्यक्त केले .

- Advertisment -

You cannot copy content of this page