Friday, October 18, 2024
Homeमहाराष्ट्ररायगड" आमच्या शेपटीवर पाय द्याल तर चावा घेतल्याशिवाय सोडणार नाही " -...

” आमच्या शेपटीवर पाय द्याल तर चावा घेतल्याशिवाय सोडणार नाही ” – सुधाकर भाऊ घारे..

मनसे , भाजपाला खिंडार , अनेकांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश !

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) आमच्या वाटेला गेलात , आमच्या शेपटीवर पाय ठेवला तर आम्ही चावा घेतल्याशिवाय राहणार नाही , असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सुधाकर भाऊ घारे यांनी आमदार महेंद्र थोरवे यांचे मतदार संघात चाललेल्या ” कट कारस्थान ” बद्दल खडे बोल सुनावले . आज बुधवार दिनांक ९ ऑक्टोंबर २०२४ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कर्जत येथील कार्यालयात मनसे , भाजपा व इतर पक्षाच्या अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेते सुधाकर भाऊ घारे यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्ष प्रवेश झाला.

यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादीचे नेते सुधाकर भाऊ घारे यांच्या समवेत जिल्हा युवा अध्यक्ष अंकित साखरे , खालापूर तालुका अध्यक्ष संतोष बैलमारे , महिला विधानसभा अध्यक्षा सुरेखा खेडकर , महिला कर्जत तालुका अध्यक्षा ऍड. रंजना धुळे , युवा कर्जत तालुका अध्यक्ष स्वप्नील पालकर , हरपुडे , युवा नेते केतन बेलोसे , त्याचप्रमाणे दोन्ही तालुक्यातील पदाधिकारी , महिला आघाडी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना सुधाकर भाऊ घारे पुढे म्हणाले की , सध्या लोकांना घास पचत नसताना यांना रस्त्यावरची ” डांबर ” कशी पचते , मी घरी जात असलेला रस्ता यांनीच बनवला आहे , तो इतका खराब झाला आहे की , विचार पडतो शिवसेनेचे आमदार यांनी कुठला विकास केला ? असा संतप्त प्रश्न त्यांनी उपस्थित केला . या तालुक्यात शेतकरी बांधवांसाठी दोन शेती विषयक प्रशिक्षण केंद्र असताना बी बियाणे येतात की नाही , त्यांचे काय प्रश्न आहेत का ? याची साधी चौकशी केली जात नसल्याचा आरोप त्यांनी आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर करून , यासर्वांचा जाब विचारण्यासाठी आम्ही सक्षम आहोत , यावर प्रकाश टाकला . त्यांचे भाऊ , त्यांचे साडू माझ्या सोबत आहेत , म्हणूनच तुम्ही तुमचं काम करा , आमच्या शेपटीवर पाय देवू नका , नाहीतर चावा घेतल्याशिवाय आम्ही सोडणार नाही . या मतदार संघात मोठ मोठ्या कंपनी असताना कुणाला कामे दिली का , या कंपन्यात ठेका कुणाचे आहेत ? हे देखील शोधावे लागेल . आम्हाला महिला भगिनी यांना सक्षम करण्याचे काम करायचे आहे , साडी वाटून कोण आमदार होत नाही , हे त्यांचे वक्तव्ये येणाऱ्या निवडणुकीत महिला भगिनी धडा शिकविल्या शिवाय रहाणार नाहीत , असा इशारा त्यांनी दिला . माझ्याकडे चिन्ह नाही तर हि ” युवा शक्ती ” माझ्याकडे आहे , सर्व कार्यकर्ते जोमाने काम करत आहेत , सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न करू , आज पक्ष प्रवेश करणाऱ्या सर्वांचा पक्षात सन्मान व तुमच्या सर्व समस्या सोडविण्यात येतील , असे आश्वासन त्यांनी याप्रसंगी दिले.

तर विधानसभा अध्यक्षा सुरेखा खेडकर यांनी देखील आमदार महेंद्र थोरवे व जिल्हाप्रमुख संतोष भोईर यांचा खरपुस समाचार घेतला . आमचा पक्ष कुठला हा विचार करू नका , येथे आता भूमिपूजन कार्यक्रम सुरू आहेत , त्याचा निधी आणला कुठून ? असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला . खोपोलीत अजूनही विकास झाला नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारकाचे काम भकास केले आहे , दवाखाने नाहीत , असा आरोप त्यांनी याप्रसंगी केला . सुधाभाऊंची लोकप्रियता मोठी आहे , शाळा , रोजगार , छञपती यांचे रायगड दर्शन , पंढरपूर वारी , तिरुपती बालाजी दर्शन , असे मोठे कार्य केले , पण हे भांडी वाटत आहेत , भांडी वाटून कुणी मोठे कार्य केले नाही , असा सल्ला त्यांनी विरोधक शिवसेनेला दिला.

यावेळी मनसे कर्जत शहर अध्यक्षा भारती कांबळे , भाजपाचे किशोर शितोळे व त्यांचे मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते , खालापूर , आत्करगाव , बामचां मळा , अखिल भारतीय पोलीस संघटनेचे ज्ञानेश्वर साळुंखे , पोलीस मित्र संघटनेचे सहकारी , शिलार , नेरळ शहर खांदा विभाग येथील अनेक कार्यकर्ते व महिला वर्गांची राष्ट्रवादीचे नेते सुधाकर भाऊ घारे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पक्ष प्रवेश केला.
- Advertisment -

You cannot copy content of this page