Sunday, June 23, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडआमदार गोपीचंद पडळकर यांनी केली धनगर आरक्षण न्यायालयीन आरक्षण लढ्याला 10 लाखांची...

आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली धनगर आरक्षण न्यायालयीन आरक्षण लढ्याला 10 लाखांची आर्थिक मदत..


खोपोली- दत्तात्रय शेडगे

बहुजनांचे समाजाचे नेते आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज धनगर आरक्षण न्यायालयीन लढ्याला 10 लाखांची आर्थिक मदत आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्रबोधन मंच याकडे सुपूर्द केली.

धनगर समाजाला एसटी चे आरक्षण मिळावे यासाठी धनगर समाज गेल्या अनेक वर्षांपासून धनगर आरक्षणाचा प्रश्न धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली लढत आहे यासाठी अनेक मोर्चे ,आंदोलन, रस्ता , ढोल बजावो,सरकार जगावो आंदोलन करण्यात आले असून एकीकडे न्यायालयातही धनगर समाजाचे लढा चालू ठेवला असून न्यायालयाची प्रकिया ही अंतिम टप्यात आली आहे.
न्यायालयीन प्रक्रियेला आर्थिक पाठबळ म्हणून आज आमदार गोपीचंद पडळकर यांनी झरे (आटपाडी )येथे 10 लाखांची आर्थिक मदत केली.यावेळी आमदार गोपीचंद पडळकर, धनगर समाजाचे नेते अशोक शेजवाळ, सोपान काळे, टीएस काळे झ कोळपे आदींसह अनेक समाज बांधव उपस्थित होते.
- Advertisment -

You cannot copy content of this page