Thursday, October 31, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडआमदार महेंद्र थोरवे यांनी दिल्या खालापूरातील आदिवासी वाड्यांना पाण्याच्या टाक्या...

आमदार महेंद्र थोरवे यांनी दिल्या खालापूरातील आदिवासी वाड्यांना पाण्याच्या टाक्या…

रायगड दि.17:खालापूर नगरपंचायत हद्दीतील शिरवली आदिवासी वाडी आणि मठ आदिवासी वाडी येथे आमदार महेंद्र थोरवे यांनी पाण्याच्या टाक्या उपलब्ध करून दिल्या आहेत. यामुळे येथील आदिवासी बांधवांच्या पाण्याची समस्या अखेर संपली आहे.

खालापूर नगरपंचायत हद्दीत ह्या दोन्ही वाड्या येत असून येथील आदिवासी बांधवाना पाण्यासाठी पायपीट करावी लागत होती. याची दखल घेत शिवसेना नेते नवीन घाटवळ यांच्या मागणीनुसार आमदार महेंद्र थोरवे यांनी या गावांसाठी प्रत्येकी तीन हजार लिटर पाण्याच्या टाक्या उपलब्ध करून दिल्या आहेत. यामुळे आदीवासी बांधवांची पाण्याची प्रतीक्षा अखेर संपली आहे.या टाक्यांचे उदघाटन आज बिपीन घाटवळ, मारुती पवार यांच्या हस्ते करण्यात आले.


यावेळी मंदाताई भोसले, शिवसेना नेते रोहित विचारे, अवधूत भुरके, नितीन पाटील, नंदकुमार लोहार, इंगळे बुवा, उमेश पडवकर,दिलीप पवार, निकील मिसाळ, नयन मानकामे, राजेश पवार, आदी मान्यवर उपस्थित होते.

- Advertisment -

You cannot copy content of this page