Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्ररायगड" आमदार महेंद्र शेठ थोरवे फाऊंडेशन व शिवसेना महिला आघाडी-कर्जत " यांचे...

” आमदार महेंद्र शेठ थोरवे फाऊंडेशन व शिवसेना महिला आघाडी-कर्जत ” यांचे उत्कृष्ठ नियोजन..

शिवसेना नेत्या दिपाली सय्यद भोसले व शिल्पा नवलकर यांच्या उपस्थितीत मंगळागौर खेळ व हळदी कुंकू समारंभास महिलांची तुफानी गर्दी !

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) आमदार महेंद्र शेठ थोरवे फाऊंडेशन व शिवसेना महिला आघाडी, कर्जत यांचे उत्कृष्ठ नियोजन व शिवसेना नेत्या तथा सिने अभिनेत्री दिपाली सय्यद भोसले व ” बाईपण भारी देवा ” फेम शिल्पा नवलकर यांच्या उपस्थितीत मंगळागौर खेळ व हळदी कुंकू समारंभ शनिवार दि. २६ ऑगस्ट २०२३ रोजी दुपारी ३ – ०० वाजता रॉयल गार्डन, कर्जत येथे महिलांची तुफानी गर्दीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी अनेक महिलांनी या मंगळागौर सणात सहभागी होवून गाणी म्हणत खेळ खेळला.

यावेळी आयोजित मंगळागौर खेळ व हळदी कुंकु समारंभास कर्जत तालुक्यातील रणरागिणी शिवसेना महिलांची ” न भूतो , न भविष्यती ” अशी गर्दी बघून शिवसेना नेत्या व अभिनेत्री दिपाली सय्यद भोसले व बाईपण भारी देवा फेम शिल्पा नवलकर यांना देखील उत्साह वाटला . त्यांनी याबद्दल आमदार महेंद्र शेठ थोरवे फाऊंडेशन व शिवसेना महिला आघाडी, कर्जत यांचे उत्कृष्ठ नियोजन बघुन कौतुक केले , तसेच आपल्या मतदार संघात शेकडो करोडो रुपयांचा निधी आणून ” विकासाची गंगा ” आणणाऱ्या आमदार महेंद्र शेठ थोरवे यांचे कार्यास शुभेच्छा व्यक्त केल्या.

यावेळी प्रमुख आकर्षक बक्षीस ११ हजाराची पैठणी आणि 10 आकर्षक साड्या तर लक्की ड्रॉ मध्ये काढलेल्या चिठ्ठीत कर्जत दहिवली – माधवी कांबळे , कोशाणे – मंदा ढाकवळ , चोचीची वाडी – वर्षा देशमुख , हालिवली – सुप्रिया राणे , बीड – सुशिला मार्के यांना शिवसेना नेत्या तथा सिने अभिनेत्री दिपाली सय्यद भोसले यांच्या हस्ते पैठणी बक्षीस देण्यात आल्या . यावेळी सर्वांनी नाव घेवून कार्यक्रमाची शोभा वाढविली.

यावेळी आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी श्रावण मासातील मंगळागौर सण हा उत्सवाची पर्वणी…….आनंदाला गवसणी……असून महिलांच्या आवडीचा सण आहे .” बाईपण भारी देवा ” , या चित्रपटातून हा सण महिलांच्या समस्यावर असलेला विजय आहे , भारतीय संस्कृती व संस्काराचे जतन या निमित्ताने होत आहे , महिला संघटन मजबूत असल्याचे हे चित्र आहे , बदलत्या युगाचे चित्र आपणास पाहायला मिळत आहे . महिला सक्षमीकरण करण्यासाठी अनेक उपक्रम शासनाच्या माध्यमातून देशात व राज्यात राबवित आहोत , हि प्रगती महिलांच्या माध्यमातून होत आहे असे मत व्यक्त करत हजारोंच्या संख्येने उपस्थित ” शिवसेनेच्या रणरागिणी ” या सणास उपस्थित राहून उल्लेखनीय कार्यक्रम झाल्याने त्यांनी ” आमदार महेंद्र शेठ थोरवे फाऊंडेशन व शिवसेना महिला आघाडी – कर्जत ” यांचे उत्कृष्ठ नियोजना बद्दल कौतुक व आभार व्यक्त केले.
यावेळी सर्व महिलांना छत्री वाटप करण्यात आल्या .यावेळी आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्या समवेत जिल्हाप्रमुख संतोष शेठ भोईर , मा. उपसभापती मनोहर दादा थोरवे, संघटक पंकज पाटील , कर्जत ता.प्रमुख संभाजी जगताप , नगरसेवक संकेत भासे , शहर संघटक नदीम भाई खान , कडू , शरद हजारे , आणि कर्जत खालापूर शिवसेनेचे पदाधिकारी , युवासेना, महिला आघाडी सर्व पदाधिकारी व मोठ्या संख्येने महिलावर्ग उपस्थित होता.
- Advertisment -

You cannot copy content of this page