Thursday, July 3, 2025
Homeपुणेमावळआमदार शेळके यांच्या प्रयत्नातून महागाव येथील आदिवासी बांधवांना जातीचे प्रमाणपत्र उपलब्ध...

आमदार शेळके यांच्या प्रयत्नातून महागाव येथील आदिवासी बांधवांना जातीचे प्रमाणपत्र उपलब्ध…

पवनानगर : पवन मावळातील महागाव येथील 35 कातकरी बांधवांना जातीचे दाखले घरपोच देण्यात आले . आमदार सुनील शेळके यांच्या सहकाऱ्यांनी आज शुक्रवार दि.10 रोजी दाखल्यांचे घरपोच वाटप केले . कातकरी बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध उपक्रम आमदार सुनिल शेळके यांनी राबविले आहेत.

काही महिन्यांपूर्वी ‘ आदिम कातकरी सेवा अभियान ‘ राबवून तालुक्यातील प्रत्येक गाव , वाडी वस्तीवरील कातकरी बांधवांच्या घरापर्यंत पोहोचून जातीच्या दाखल्यांचे अर्ज भरून घेतले होते व पुढील प्रक्रियेसाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा करत जातीचे दाखले काढून दिले.

दुर्गम भागातील कातकरी बांधवांना जातीच्या दाखल्यांसाठी कागदपत्रांची पूर्तता करताना शासकीय कार्यालयात अनेक हेलपाटे मारावे लागतात . त्यांचा वेळही वाया जातो व रोजंदारीवर उपजिवीका असल्यामुळे संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्याची अनास्था त्यांच्या मनामध्ये निर्माण होते . आमदार शेळके यांनी यासाठी योग्य नियोजन केल्यामुळे अल्प कालावधीतच जातीचे दाखले उपलब्ध झाल्याने कातकरी बांधवांनी आभार मानले . आमदार सुनिल शेळके यांचे सहकारी गावातील कातकरी वस्त्यांवर जाऊन कातकरी बांधवांना जातीचे दाखले देत आहेत . कातकरी बांधवांसाठी शासनाच्या विविध योजना आहेत . परंतु जातीचा दाखला नसल्यामुळे त्या योजनांचा लाभ मिळवण्यात अडचणी येतात . आता जातीचा दाखला उपलब्ध झाल्याने मावळातील कातकरी बांधवांना विविध योजनांचा लाभ घेणे शक्य होणार आहे.

यावेळी उपसरपंच स्वाती बहिरट , राष्ट्रवादी काँग्रेस मावळ युवती अध्यक्षा आरती घारे , माजी उपसरपंच रामदास घरदाळे , माऊली निकम , संतोष घारे , दशरथ सावंत , भानुदास बहिरट , केशव सावंत , रामदास घारे तसेच आमदार सुनिल शेळके यांचे कार्यालयीन प्रतिनिधी सचिन वामन , नबीलाल आत्तार आदी उपस्थित होते.

- Advertisment -

You cannot copy content of this page