Wednesday, October 16, 2024
Homeपुणेमावळआमदार शेळके यांच्या प्रयत्नातून पाच ग्रामपंचायतींना कचरा संकलनसाठी घंटा गाड्या...

आमदार शेळके यांच्या प्रयत्नातून पाच ग्रामपंचायतींना कचरा संकलनसाठी घंटा गाड्या…

मावळ दि.3: मावळ तालुक्यातील कामशेत-खडकाळा, आंबी, मंगरुळ, निगडे, आंबळे या पाच ग्रामपंचायतीस कचरा संकलनासाठी जिल्हा खनिज प्रतिष्ठान अंतर्गत सहा कचरा वाहतूक घंटागाड्या उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. या गाड्यांचे लोकार्पण तळेगाव दाभाडे येथे आज आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या हस्ते करण्यात आले.


मावळ तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीच्या हद्दीतील नागरीकरण वाढत आहे.याचा अतिरिक्त ताण ग्रामपंचायतीकडून पुरविल्या जाणाऱ्या मूलभूत सुविधांवर होत आहे.

नागरिकांनी रस्त्याच्या कडेला कचरा टाकू नये यासाठी घंटागाडीवरील ध्वनिक्षेपकाद्वारे जनजागृती करावी. नागरिकांनी ओला,सुका कचरा वर्गीकरण करुन सहकार्य करावे. ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील कचरा वेळेत उचलला जावा. साचणाऱ्या कचऱ्यामुळे इतर आजार, दुर्गंधी पसरू नये यासाठी या कचरा वाहतूक घंटागाड्यांचे योग्य नियोजन व्हावे.

अशी अपेक्षा ग्रामपंचायत लोकप्रतिनिधींकडून असल्याचे यावेळी बोलताना आमदार सुनील शेळके म्हणाले.यावेळी गटविकास अधिकारी मा.सुधीर भागवत, ग्रामसेवक, ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य तसेच आजी-माजी पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.

- Advertisment -

You cannot copy content of this page