Wednesday, September 27, 2023
Homeपुणेलोणावळाआमदार शेळके यांनी लोणावळ्यातील अतिक्रमणग्रस्त टपरी धारकांना दिलेल्या अश्वासनातून 23 टपरी धारकांना...

आमदार शेळके यांनी लोणावळ्यातील अतिक्रमणग्रस्त टपरी धारकांना दिलेल्या अश्वासनातून 23 टपरी धारकांना आर्थिक मदत…

लोणावळा दि.17: लोणावळ्यातील टपरी धारकांना आमदार सुनील शेळके यांच्यावतीने प्रत्येकी 10 हजार रुपयांची मदत.
कोरोना काळात एमएसआरडीसी व लोणावळा नगरपरिषदेणे केलेल्या अतिक्रमण कारवाईत अनेक व्यवसायिकांचे व्यवसाय उध्वस्त झाले असता 23 टपरी धारकांचे या कारवाईमूळे जगणे हलाखीचे झाले होते.

अशा प्रसंगात आमदार सुनील शेळके यांनी या अतिक्रमण ग्रसतांची भेट घेऊन त्यांना मदत करण्याचे अश्वासन दिले होते त्याच अश्वासनाला जागे राहत आमदार शेळके यांच्या वतीने आज लोणावळ्यातील 23 टपरी धारकांना प्रत्येकी 10 हजार रुपयांची रोख मदत करण्यात आली आहे.

आमदार शेळके यांचे बंधू व उद्योजक सुधाकर शेळके यांच्या हस्ते ही मदत प्रदान करण्यात आली. यावेळी लोणावळा शहर टपरी संघटनेचे अध्यक्ष वसंतराव काळोखे, राष्ट्रवादी काँग्रेस लोणावळा शहर अध्यक्ष जिवन गायकवाड, गणेश थिटे, विलास बडेकर, धनंजय काळोखे, अविनाश ढमढेरे, गणेश चव्हाण, लक्ष्मण दाभाडे, अमोल गायकवाड, फिरोज शेख, निलेश लोखंडे, समीर खोले इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

- Advertisment -