Friday, March 24, 2023
Homeपुणेलोणावळाआमदार सुनील शेळके यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवून उत्सहात साजरा....

आमदार सुनील शेळके यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवून उत्सहात साजरा….

लोणावळा दि. 20 : मावळ तालुक्याचे जनसेवक लोकप्रिय आमदार सुनिल अण्णा शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त लोणावळा परिसरामध्ये श्री.दिपक मालपोटे मित्र परिवार..शितळादेवी नगर महिला मंडळ व सहकारी यांच्या पुढाकाराने लोणावळा परिसरातील विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले.
आमदार शेळके यांनी सामाजिक भान ठेवून.. सामाजिक उपक्रम राबवून माझा वाढदिवस साजरा करावा.. असे आवाहन केले होते. त्याच आवाहनास प्रतिसाद देवून झाडे लावा झाडे जगवा हा उपक्रम राबविण्यात आला आहे.तसेच वृक्षारोपण ठिकाणी वाढदिवसही साजरा करण्यात आला. असा अगळावेगळा सामाजिक बांधिलकी जपत निसर्गाशी एकरूप होऊन जनसेवक आमदार सुनिल अण्णा शेळके यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
त्यावेळी दिपक मालपोटे, योगेश कोठावदे, किशोर घारे, अक्षय काळे, अशोक ढाकोळ, अभिजीत मालपोटे, कुलदिप ठोसर, हरिओम ठोसर, प्रसाद शेलार, राकेश सालुंखे आणि महिला मंडळ – ज्योती मालपोटे, संगीता घारे, पल्लवी कोठावदे, प्रभा वाणी, जयश्री चव्हाण, स्नेहा घारे, सुषमा चव्हाण, चांदणी ठोसर, कनोजीया आदि मान्यवर व महिला कार्यकर्त्या उपस्थित होते.

You cannot copy content of this page