आमदार सुनील शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली वडगाव मावळ येथील राष्ट्रवादी काँग्रेसची कार्यकारिणी जाहीर…

0
102

वडगाव मावळ : मावळचे लोकप्रिय आमदार सुनिल आण्णा शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली आज वडगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रवादी युवक काँग्रेससह सतरा प्रभाग अध्यक्ष, सतरा प्रभाग संघटकांची नूतन कार्यकारिणी जाहीर झाली.

आमदार सुनील आण्णा शेळके, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गणेशभाऊ खांडगे, नगराध्यक्ष मयुर ढोरे, रा. काँ. अध्यक्ष प्रविण ढोरे, रा. काँ. युवक अध्यक्ष अतुल वायकर आणि मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत वडगांव शहर राष्ट्रवादी काँग्रेसची ही कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून यावेळी माजी राज्यमंत्री मदनजी बाफना, आमदार सुनिल आण्णा शेळके, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, माजी सभापती गणेश आप्पा ढोरे, नगराध्यक्ष मयूरदादा ढोरे, जिल्हा नि समितीचे सदस्य विठ्ठलराव शिंदे, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुभाषराव जाधव, जेष्ठ नेते मंगेशकाका ढोरे, राष्ट्रवादी युवक अध्यक्ष किशोरभाऊ सातकर, वडगांव महिला शहराध्यक्षा पद्मावती ढोरे, नगरसेवक राजेंद्र कुडे, सुनिल ढोरे, पंढरीनाथ ढोरे, चंद्रजित वाघमारे, राहुल ढोरे, शिंदे गुरूजी, चंदूकाका ढोरे, गंगाधर ढोरे, बारकूनाना ढोरे, प्रकाश कुडे, आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व सेलचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेस नवनिर्वाचित पदाधिकारी पदग्रहण समारंभावेळी सुरुवातीस लोकप्रिय आमदार सुनील आण्णा शेळके, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेशभाऊ खांडगे, वडगांव शहरातील पत्रकार बांधव तसेच वडगाव शहर विविध कार्यकारी सोसायटीच्या बिनविरोध संचालकपदी निवड झालेल्या सर्व संचालकांना वडगांव शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने सन्मानित करण्यात आले.

आज राष्ट्रवादी कॉंग्रेसची व रा युवक काँग्रेसची कार्यकारिणी जाहीर होत असताना शहरातील सर्व सतरा प्रभागातील प्रभाग अध्यक्ष व प्रभाग संघटकांची निवडही करण्यात आली.
यावेळी आमदारांसह राष्ट्रवादीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनिर्वाचित पदाधिकारी, प्रभाग अध्यक्ष, प्रभाग संघटक यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अतुल राऊत यांनी केले तर रा. काँग्रेसचे कार्याध्यक्ष सिद्धेश ढोरे यांनी स्वागत केले. तसेच शहराध्यक्ष प्रविण ढोरे यांनी प्रास्ताविक केले. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष अतुल वायकर यांनी आभार मानले.